Sanjay Raut : राज ठाकरे-फडणवीस भेट, राजकीय वातावरण तापलं, त्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ते गणपतीचं आमंत्रण…

Raj-Fadnavis Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यावर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार कोपरखळी मारली. काय म्हणाले राऊत?

Sanjay Raut : राज ठाकरे-फडणवीस भेट, राजकीय वातावरण तापलं, त्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ते गणपतीचं आमंत्रण...
राज ठाकरे,देवेंद्र फडणवीस, संजय राऊत
| Updated on: Aug 21, 2025 | 10:14 AM

आज सकाळीच राज्याच्या राजकीय पटलावर मोठी घडामोड पाहायला मिळाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील नागरी समस्यांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची चर्चा सुरू असताना या भेटीला महत्त्व आले आहे. खासदार संजय राऊत यांनाी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या मुद्दावर जोरदार कोपरखळी मारली. त्यांनी भाजपला असा खास चिमटा काढला.

ते गणपतीचं आमंत्रण…

सध्या गणपती उत्सव तोंडावर आहे. राज्यात घरोघर गणपती येतात. कदाचित ते गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेले असतील, असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. राज्यासंदर्भातील काही प्रश्न असतील. फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरं बुडाली आहेत. त्यामध्ये कुणाला इतका त्रास करून घेण्याची गरज नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. आम्हाला त्रास झालाय का तर नाही. आम्हाला माहिती आहे काय आहे ते, असे राऊत म्हणाले.

राज ठाकरेच भेटीबद्दल सांगतील

राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटतातच. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. या भेटीबद्दल राज ठाकरेच अधिक सांगू शकतील. दोन मोठे नेते भेटत आहेत. एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर दुसरे राज ठाकरे हे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू असेल, असे तुम्ही म्हणताय. या भेटीत काय चर्चा झाली, कोणत्या विषयावर काय बोलणे झाले हे राज ठाकरे सांगतील. ते परखड नेते आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही, असे संजय राऊत म्हणाले. उद्या माझं काही काम असेल. उद्धव ठाकरे यांचं काही काम असेल तर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही. तो राज्याचा मुख्यमंत्री असतो, असे संजय राऊत म्हणाले.

50 हजार कोटींचा भ्रष्टाचार

यावेळी त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला की नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं असे ते म्हणाले. नवलकर यांना बेकायदेशीरपणे, सर्वोच्च न्यायालयाचा कायदेशीर आदेश डावलून 5000 हजार एकर वनजमीन 25 दिवसात सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिल्याचा आरोप राऊतांनी केला. हे सरकारी आदेश सर्वांसाठी खुले आहेत. तर आता केंद्रीय गृहमंत्री घटना दुरुस्ती करून मंत्र्यांना अटक करण्याचा जो कायदा आणू इच्छित आहे, त्याचा पहिला प्रयोग संजय शिरसाट यांच्यावर करावा असा घणाघात राऊतांनी यावेळी घातला.