AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Donation: राम मंदिरात चोरी झाली, बोलायचं नाही? वा रे वा… यात धर्माचा अपमान कुठे? राज ठाकरे संतापले

Raj Thackeray on Ram Mandir Donation Scam: राम मंदिरात चोरी होत असेल तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? राज ठाकरे यांनी सरकारला खणखणीत सवाल विचारला आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सरकारला धारेवरच धरले नाही तर सणसणीत टोले हाणले.

Raj Thackeray Donation: राम मंदिरात चोरी झाली, बोलायचं नाही? वा रे वा... यात धर्माचा अपमान कुठे? राज ठाकरे संतापले
राज ठाकरे, राम मंदिरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 1:21 PM
Share

Raj Thackeray on Ram Mandir Donation Scam: राम मंदिरातील देणगीत मोठा अपहार झाला. त्यावरून राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यावरून प्रश्न विचारल्यावर भाजप आणि संघाच्या गोटातून सातत्याने हल्लाबोल करण्यात येत असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचे चांगलेच माप काढले. राम मंदिरात चोरी होत असेल तर त्यावर काहीच बोलायचं नाही का? असा खणखणीत सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सरकारला धारेवरच धरले नाही तर सणसणीत टोले हाणले आहे.

चोरीबद्दल बोललं तर म्हणे धर्माचा अपमान

राज ठाकरे यांनी सरकारच्या दुटप्पी धोरणावर सणाणून टीका केली. मिसिंग लिंकसह त्यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील दानपेटीतील अपहरणावरून सरकारला धारेवर धरले. “आता केंद्राची कामे आहे. त्याचा देशाचा काय संबंध. मिसिंग लिंकबद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान कुठे आला. लोकांनी प्रश्न विचारायचे नाही ना. इतके दिवस मोबाईलवरून विरोधकांना शिव्या घालायचे ते अंगलट आलंय. दामदुपटीने यांच्या अंगलट आलं. आता त्रास होतोय. तुम्हीच सुरू केल्या या गोष्टी. १०-१२ वर्षात तुम्हीच सुरू केलं. वाईट साईट बोलणं, घाण बोलणं तुमच्या टीमने केलं. तुमच्या अंगावर आल्यावर कसा आला महाराष्ट्राचा अपमान. राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललं तर म्हणे धर्माचा अपमान. यात धर्म कुठे आला. त्या मंदिराबद्दल आमचीही आस्था आहे. १४०० कोटी चोरले जातात, पडदा किती असावा यांच्यासमोर. म्हणे वक्फ बोर्डात चोऱ्या झाल्या तुम्ही नाही बोलला. आम्हाला काय देणंघेणं. राम मंदिरात दानपेटीत टाकलं. त्याची चोरी होत असेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही? काल होसबळे म्हणाले, धर्मविरोधी लोक पसरवत आहे. आम्ही धर्मविरोधी? हा देश धर्मविरोधी आहे? मंदिरातून चोरी होते हे सांगणारं कोण होतं. बोलणारं कोण होतं. भाजपचा खासदारच बोलला चोरी झाली. आम्ही बोललो? देश बोलला? १५ ट्रस्टींपैकी १२ केंद्र सरकार नेमते. १२ पैकी केंद्राने नेमलेली माणसं संघ, भाजप आणि विहिंपशी संबंधित आहे. बाकी कोणी नाही.” अशी खणखणीत टोलेबाजी राज ठाकरे यांनी भाषणातून केली.

कितीची चोरी झाली हेच माहिती नाही

केंद्र सरकारने नेमलेले आयएएस अधिकारी आहे. आता १४०० कोटीचा आकडा आलाय. कितीची चोरी झाली माहिती नाहीये, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला. समजा पकडा दुसऱ्या कुणाचं सरकार असतं आणि राम मंदिरात चोरी झाली असती तर भाजप,संघ विश्व हिंदू परिषदेने काय केलं असतं. मोर्चे काढले असते. त्यात राजकारण नसतं का. विरोधकांनी केलं तर म्हणे राजकारण, असा चिमटाही ठाकरे यांनी सरकारला काढला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ