Garjana Morcha : काँग्रेसची पाठ पण ठाकरेंच्या गर्जनेला शरद पवारांची साथ, राष्ट्रवादीकडून मोर्चात कोण-कोण सहभागी होणार?

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गर्जना मोर्चा अगदी थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात या मोर्चात कोण-कोण नेते सहभागी होणार आहेत?

Garjana Morcha : काँग्रेसची पाठ पण ठाकरेंच्या गर्जनेला शरद पवारांची साथ, राष्ट्रवादीकडून मोर्चात कोण-कोण सहभागी होणार?
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस
| Updated on: Oct 04, 2026 | 10:04 AM

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शड्डू ठोकले आहेत. अगदी थोड्याच वेळात मुंबईत गर्जना मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. त्या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होईल. या मोर्चाला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीही साथ दिली आहे. पण मोर्चाकडे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली आहे. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या मोर्चात दिसतील. या मोर्चात कोण-कोण नेते सहभागी होणार आहेत?

राहुल गांधी यांची भूमिका काय?

Loading...

निवडणूक आयोगाविरोधात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने हल्लाबोल करत आहेत. त्यांनी यापूर्वीच दोन ते तीन पत्रकार परिषद घेऊन बॉम्बगोळा टाकलेला आहे. या मुद्यावर सर्व विरोधकांनी एकत्र येत आंदोलन छेडण्याचे विचार त्यांनी मांडले आहे. वेगवेगळ्या बॅनरखाली लढण्यापेक्षा निवडणूक आयोगाविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आजच्या मोर्चात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार असले तरी मोठ्या नेत्यांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यांची मोर्चाकडे पाठ

ठाकरे बंधूंच्या आजच्या मुंबईतील मोर्चाकडे काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नियोजित बैठकांच्या कारणानं अनुपस्थित राहणार आहे. तर, मुंबई कॉग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडही उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. शरद पवार काही पक्षाचे नेते उपस्थित राहणार तर काँग्रेसचे महत्वाचे नेते मात्र मोर्चात दिसण्याची शक्यता कमीच मानली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे हे नेते सहभागी होणार

गर्जना मोर्चात सर्व पक्षीयांनी सहभागी व्हा असे आवाहन ठाकरे बंधूंनी केले होते. या आवाहनाला किती विरोधक प्रतिसाद देणार, असा सवाल विचारल्या जात होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार काही पक्षाचे नेते उपस्थित राहणार तर काँग्रेसचे महत्वाचे नेते मात्र मोर्चाकडे पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे नेते सहभागी होणार आहे. तर, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. शेकाप, डावे पक्षातील नेतेही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us