AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav- Raj Thackeray: निवडणूक आयुक्तांविरोधात आज एल्गार , मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा, उद्धव आणि राज ठाकरे काय करणार ‘गर्जना’?

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शुक्रवारी CJP ने छत्रपती शिवाजी महाराज पार्क दणाणून सोडले. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्याविरोधात काय गर्जना करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Uddhav- Raj Thackeray: निवडणूक आयुक्तांविरोधात आज एल्गार , मेट्रो सिनेमा ते महापालिका धडक मोर्चा, उद्धव आणि राज ठाकरे काय करणार 'गर्जना'?
उद्धव ठाकरे-राज ठाकरे गर्जना मोर्चा, मुंबई
| Updated on: Oct 04, 2026 | 7:10 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha Today: केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज महामोर्चा निघणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र आले आहेत. मेट्रो सिनेमा ते महापालिका असा मोर्चा धडकणार आहे. सकाळी 10 वाजता या मोर्चासाठी कार्यकर्ते, नागरीक जमा होण्यास सुरुवात करतील. तर साधारणपणे 11 वाजता मोर्चाला सुरूवात होण्याची शक्यता आहे. आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्यांच्याविरोधात काय गर्जना करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ज्ञानेश कुमार ठाकरे बंधूंच्या हिटलिस्टवर

केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारभार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे कथित वादग्रस्त निर्णयाविरोधात दोन्ही बंधूंनी महाविकास आघाडीसोबत यापूर्वीही एल्गार केला होता. ईव्हीएम मशीनबाबत त्यांचा आक्षेप होता. तर त्याचवेळी निवडणूक याद्यांमध्ये घोळाचाही आरोप करण्यात आला होता. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले. त्यानंतर त्यांनी सत्याचा मोर्चा, तिरंगा मोर्चा काढला. आता ठाकरे बंधू यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी गर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे. आज मुंबईत सकाळी गर्जना मोर्चा निघेल. या मोर्चात मनसैनिक, शिवसैनिक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरीक सहभागी होतील. या मोर्चाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

मोर्चानंतर जाहीर सभा

शिवसेना आणि मनसेने गर्जना मोर्चासाठी मोठी तयारी केली आहे. काल राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. तर इकडे उद्धव सेनेने सुद्धा मोर्चाची तयारी केली आहे. सकाळी हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून निघेल. यापूर्वी तो भायखळा येथून निघणार होता. पण त्याच्या मार्गात बदल करण्यात आला. हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ येईल. या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर होईल. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह इतर नेते मोर्चात काय गर्जना करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

गर्जना मोर्चाच्या बॅनरची चर्चा

राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित आंदोलनाचे दादरसह मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत. आज निवडणूक आयोगाच्या विरोधात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी आंदोलन पुकारलेले आहे. याच आंदोलनासाठी नागरिकांना एकत्रित येण्यासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. गर्जना लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असा उल्लेख या बॅनर वरती करण्यात आलेला आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर