’20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार’

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर राहुल शेवाळे म्हणाले की, २० वर्षानंतर राज ठाकरे हे शिवसेनेला मतदान करणार आहेत ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. राज ठाकरे यांनी उन्हामुळे काळजी घेण्याचा सल्ला देखील दिल्याचं ते म्हणाले.

'20 वर्षांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार'
Rahul Shewale
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 3:30 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आज महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि इतर नेते उपस्थित होते. मुंबई दक्षिण मध्यमधून महायुतीकडून राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 17 मे रोजी महायुतीची सभा होणार आहे. याबाबत देखील राज ठाकरे यांनी सूचना दिल्याची माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

उष्णतेमुळे काळजी घेण्याचा सल्ला

राज ठाकरे यांनी सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतः ची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. असं राहुल शेवाळे यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट प्रेरणादायी ठरल्याचं राहुल शेवाळे म्हणाले. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं देखील ते म्हणाले. तसेच 17 मे च्या महायुतीच्या सभेत राज सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील. असं राहुल शेवाळे म्हणाले.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर मुंबईत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली होती. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभेची जागा लढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.