लस वाया घालवण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवू नका : राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोना लसीकरणावरुन सडेतोड उत्तर दिलंय.

लस वाया घालवण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवू नका : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 3:34 AM

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना लसीकरणावरून राजकारणाचा पारा चांगलाच चढलाय. महाराष्ट्र सरकारने वारंवार कोरोनाची मागणी केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यापासून अगदी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दावे करत सरकारवर आरोप केले. याला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. प्रकाश जावडेकर यांनी काही आकडेवारी देत महाराष्ट्रात 6 टक्के कोरोना लसी वाया केल्याचा आरोप केला. हा आरोप राजेश टोपे यांनी खोडून काढलाय. तसेच महाराष्ट्राच्या सुपुत्राने महाराष्ट्राची बदनामी करु नये, असं आवाहन केलंय (Rajesh Tope hit Prakash Javdekar over wrong facts on Corona Vaccination in Maharashtra).

राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा.”

“फडणवीस सांगत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राला लसींचा नीट पुरवठा होणार नाही”

सचिन सावंत म्हणाले, “जोपर्यंत फडणवीसजी सांगत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्राला लसींचा पुरवठा नीटपणे केला जाणार नाही. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राला केंद्राकडून वेठीस धरले जात आहे. मोदी शाह भेटीत हेच ठरले. मविआ सरकारला बदनाम करण्याच्या नादात महाराष्ट्र बदनाम होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आकडेवारी दर्शवून केंद्र सरकारची महाराष्ट्राबद्दल अन्यायकारक व भाजपाशासित राज्यांना झुकते माप उघड पाडले आहे. अशास्थितीत महाराष्ट्राकरिता लढण्याऐवजी फडणवीस व जावडेकरांसारखे भाजपा नेते महाराष्ट्र द्रोहच करत आहेत.”

जावडेकरांनी काय दावा केला?

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत दावा केला, “महाराष्ट्र सरकारने लसीकरणावरुन राजकारण करु नये. आजपर्यंत राज्याला एकूण 1 कोटी 6 लाख 19 हजार 190 कोरोना लस देण्यात आल्यात. यापैकी 90 लाख 53 हजार 523 कोरोना लसी वापरण्यात आल्यात. त्यात 6 टक्के कोरोना लसी म्हणजेच 5 लिटर कोरोना लस वाया गेल्या. सध्या 7 लाख 43 हजार 280 कोरोना लस प्रक्रियेत आहेत. सध्या महाराष्ट्रात जवळपास 23 लाख कोरोना लसीचे डोस उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जितक्या कोरोना लस वापरात आल्यात त्यापेक्षा अधिक लसींचा पुरवठा केलाय.”

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले

गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा (Corona vaccine) साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्यही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी 40 लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने 17 लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला 40 लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई ही आर्थिक राजधानी आणि व्यापाराचे केंद्र आहे. औद्योगिकदृष्ट्याही महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत बराच मोठा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रुग्णांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लसींचे वाटप करताना प्रत्यक्ष रुग्णसंख्या हा निकष न ठेवता प्रति दक्षलक्ष रुग्णांचे प्रमाण हे परिमाण वापरले पाहिजे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्था नीट चालू नये, ही दिल्लीतील काही लोकांची इच्छा: जयंत पाटील

Maharashtra Needs Vaccine : पुणे, सातारा, सांगली, पनवेलसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांचं शटर डाऊन!

गुजरातची लोकसंख्या आपल्यापेक्षा निम्मी, तरी त्यांना जास्त लसींचा साठा, संयमी राजेश टोपे कडाडले

व्हिडीओ पाहा :

Rajesh Tope hit Prakash Javdekar over wrong facts on Corona Vaccination in Maharashtra

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.