
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांना उत्तर दिले आहे. त्यांनी अनिल परब यांना ‘चंद्रग्रहणाच्या दिवशी माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाने स्मशानभूमीत बोकड कुणी कापलं?’ असा थेट सवाल केला आहे.
रामदास कदम म्हणाले, अनिल परब साहेब तुम्ही वकील आहात. चंद्र ग्रहणाच्या रात्री १२ वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत तुम्ही एक बकरा कापला का. बघणाऱ्यांचं म्हणणं आहे अनिल परब सारखी व्यक्ती होती. एक बिल्डर बकरा घेऊन आला होता. दोन नग्न बाबा पूर्ण नग्न होते. त्यांना स्मशानभूमीत आले होते. माझं आणि योगेशचं नाव घेऊन बकरा कापला. असं मला कळलं. नक्की काय मला माहीत नाही. पण वास्तव असेल तर चुकीचं आहे. आपण शिकलेली व्यक्ती आहोत. अघोरी कृती तुमच्याकडून होऊ नये. पण तुम्ही खुलासा करा.
वाचा: मोठी बातमी! अपघाता वेळी गौतमीच्या गाडीत होता मोठा अधिकारी? काय करत होता? खळबळजनक दावा काय?
पुढे ते म्हणाले, हे सर्व थांबवा. मी नवीन नाही पक्षात. मी ५० वर्ष मातोश्रीत काढली. तुम्ही किती वर्ष होता माहीत नाही. दंगलीत पोलिसांनी दोन तीन लाठ्या मारल्या. खूप मर्दुमकी गाजवली असं उद्धवजींना सांगत होता. या प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी बोलावं. मी कालही तेच सांगितलं होतं. माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे. हे चेले चपाटे का पत्रकार परिषद घ्यावी. नाहीतर नाईलाजाने मला या प्रकरणाची चौकशी लावून घ्यावी लागेल.
बायकोने जाळून घेतलं की जाळलं? अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम यांनी, “माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा. माझी पत्नी दोन स्टोव्हवर जेवण बनवत होती. साडीला आग लागली. अन् आगीचा भडका उडाला. मी तिला वाचवलं. माझे हात भाजले. सहा महिने पत्नी अॅडमिट होती. जसलोकमध्ये. मी जसलोकमध्येच होतो. आजही आम्ही जीवाभावने संसार करतोय. तू काय सांगतो. अशा पद्धतीने तू बदनामी केलीय ना..त्यावर मी दावा टाकणार आहे. मी यावर कोर्टात पहिल्यांदा जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार आहे” असे म्हटले.