AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्रिजमध्ये रक्ताचा साठा, किचनमध्ये झुरळं-माशा अन् उंदरांची विष्ठा; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित

Kyani Restaurant: चहा-बनमस्कासाठी प्रसिद्ध Kyani & Co. अडचणीत सापडले आहे. FDA तपासणीत स्वयंपाकघरातील अस्वच्छता उघड झाली आहे. यामुळे परवाना रद्द केला आहे.

फ्रिजमध्ये रक्ताचा साठा, किचनमध्ये झुरळं-माशा अन् उंदरांची विष्ठा; मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलचा परवाना निलंबित
| Updated on: Sep 28, 2026 | 8:55 PM
Share

मुंबईतील प्रसिद्ध Kyani & Co. वर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. एफडीए प्रमुख तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत मुंबईतील ऐतिहासिक इराणी कॅफे आणि रेस्टॉरंट ‘क्यानी अँड कंपनी’च्या अन्न तयार करण्याच्या आणि साठवणुकीच्या जागेत उंदराची विष्ठा, जिवंत माश्या आणि मेलेली झुरळे आढळली. यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने त्याचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण परवाना निलंबित केला आहे.

क्यानी अँड कंपनीच्या परिसरात मांजरेही आढळून आली. तसेच एका रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचले होते. काळबादेवी येथील Kyani & Co. ची 27 सप्टेंबर रोजी FDAकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान अन्न तयार करण्याच्या आणि साठवणूक क्षेत्रात गंभीर त्रुटी आढळल्याचा FDA ने दावा केला आहे. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी मांजर आणि उंदरांची विष्ठा आढळल्याची FDA ने माहिती दिली आहे.

क्यानी अँड कंपनीत जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळल्याचाही एफडीएने दावा केला आहे. रेफ्रिजरेटरमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचलेले आढळल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. प्रक्रिया विभागात उघडे सांडपाण्याचे मॅनहोल आढळल्याचीही FDA ने माहिती दिली आहे. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे तपासणीत आढळले आहे. कच्चे पीठ छापील वर्तमानपत्राने झाकल्याचेही निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांकडून आवश्यक स्वच्छता आणि किट्सचा वापर होत नसल्याचे आढळले.

कच्चे आणि तयार अन्नपदार्थ योग्य पद्धतीने वेगळे ठेवले नसल्याचे FDAच्या तपासणीत समोर आले आहे. यामुळे गंभीर अन्न सुरक्षा आणि स्वच्छता त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला तात्काळ धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे Kyani & Co. चा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. तसेच अन्नपदार्थांची खरेदी, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री आणि वितरण तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...