मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोफळी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी

रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी इथं दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीतील पोफळी प्रकल्पाची पाहणी केली. पोफळी जलविद्युत प्रकल्पातील विद्युतगृहाचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. (Chief Minister Uddhav Thackeray inspects Pofli Dam hydropower project)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी १० च्या सुमारास कोयनानगर हेलीपॅडवर दाखल झाले. त्यानंतर मोटारीने ते पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले. त्यानंतर त्यांनी पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा – 4 ची पाहणी केली. उद्धव ठाकरे हे कोळकेवाडी टप्पा 4 ला भेट देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. तयावेळी पोफळी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोफळी धरणाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री कोयना धरणाकडे रवाना झाले. कोयना धरण परिसराची पाहणी केल्यानंतर ते विश्रामगृहात थांबणार होते. पण आपल्या दौऱ्यात अचानक बदल करुन ते पुण्याकडे रवाना झाले. मुख्यमंत्र्यांनी अचानक विश्रामगृहाचा दौरा रद्द केल्यानं तिथे निवेदन देण्यासाठी आलेल्या अनेकांची निराशा झाली. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले होते की पर्यटनासाठी? असा सवाल यावेळी उपस्थितांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्रमांक 2च्या प्रकल्पस्थळाकडे रवाना झाले. तिथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते पुसगाव यादरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची ते पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर बांधकामाचं सादरीकरणही केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या:

ठाकरे मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबविणार

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड, सोशल मीडियातून त्रास दिल्यास शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Chief Minister Uddhav Thackeray inspects Pofli Dam hydropower project

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI