AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकलमधील गर्दी कमी होणार? कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्या अखेर सुटणार? CSMT मुख्यालयात नेमकं काय ठरलं? वाचा सविस्तर

लोकलमधील गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण CSMT मुख्यालयात कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी महत्वाची बैठक झाली.

लोकलमधील गर्दी कमी होणार? कल्याण-डोंबिवलीच्या प्रवाशांच्या समस्या अखेर सुटणार? CSMT मुख्यालयात नेमकं काय ठरलं? वाचा सविस्तर
local train Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 7:23 PM
Share

लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या अडचणीत दिवसेंदिवस भर पडत आहे. लोकल डब्यातील जीवघेणी गर्दी, उशिराने धावणाऱ्या ट्रेनमुळे कर्मचारी दररोज लेटमार्कने त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेन तब्बल 1 तास उशिराने धावल्याने बदलापूर, अंबरनाथ स्टेशन मास्तरच्या कार्यालयात प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. लोकल गर्दीने त्रस्त झालेल्या प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री रविंद्र चव्हाण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे प्रबंधक हिरेश मीना आणि आमदार चव्हाणांमध्ये महत्त्वाची बैठक  झाली.

काही दिवसांपूर्वी 48 रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. या संघटनेच्या प्रतिनिधींनी डोंबिवली, दिवा आणि निळजे परिसरातील प्रवाशांच्या दैनंदिन समस्या व मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. या संघटनांच्या प्रतिनिधींची मागण्यांची दखल घेत चव्हाण यांनी CSMT मुख्यालयात रेल्वे प्रबंधकाची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीत प्रवाशांच्या समस्याचे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले.

दररोज गर्दीच्या वेळी निळजे स्थानकातून मुंबईच्या दिशेने दर तासाला रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. या निर्णयाने ऐन गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली आणि दिवा स्थानकातूनही मुंबईकडे लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. या नव्या लोकल फेऱ्यांच्या मागणीसोबत प्रवाशांची सुरक्षा, स्थानकांवरील गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि सातत्याने उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनच्या समस्येवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांना दररोज भेडसावणाऱ्या सर्व प्रश्नांवर आणि होणाऱ्या गैरसोयीवर तातडीने योग्य मार्ग काढावा, असेही चव्हाण यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला सांगितले.

मध्ये रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक 

मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या पॉवर ब्लॉकचा कसारा-आसनगाव दरम्यान लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी कसारा-आसनगाव दरम्यान विशेष ट्रॅफिक-पॉवर ब्लॉक घोषणा केली आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरदरम्यान दररोज दुपारी 3.35 ते रात्री 8.35 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या काळात N-24, N-26, N-28 आणि N-30 या लोकल रद्द राहणार आहेत.  ब्लॉकपूर्वी कसारा येथून CSMTकडे जाणारी शेवटची लोकल दुपारी 2.42 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर कसारा येथून CSMTकडे जाणारी पहिली लोकल रात्री 8.15 ऐवजी 8.35 वाजता सुटणार आहे.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?