Mumbai Local Train Mega Block: मोर्चेकरांनो, मुंबईकरांनो कृपया लक्षा द्या! लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा
Mumbai Local Train Mega Block: आज ठाकरे बंधूंचा सकाळी गर्जना मोर्चा आहे. त्यापूर्वी मुंबई लोकलविषयीची अपडेट जाणून घ्या. लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे, वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.

Mumbai Local Train Mega Block: आज ठाकरे बंधूंचा सकाळी गर्जना मोर्चा आहे. या मोर्चासाठी मुंबईसह राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते, पदाधिकारी येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मुंबई लोकलविषयीची अपडेट जाणून घ्या. लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेने अभियांत्रिकी कामासाठी तिन्ही मागाँवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक काळात लोकलच्या काही फेल्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत. तेव्हा रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.
लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी आज रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन संथगती मार्गावर, हार्बर मार्गात पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर तसेच पश्चिम रेल्वे मुख्य मार्गात बोरीवली ते राम मंदिर दरम्यान हा ब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार हार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.
मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार
आज मुंबईत ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा तर आहेच. पण सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी उपनगरातून अनेक जण बाहेर पडतात. आज काहींचा बाहेर फिरण्याचा प्लॅन असतो. रविवार असल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात काही लोकल फेऱ्या रद्द असतील. तर लोकल उशीराने धावतील. त्यांचा वेगही मंदावलेला असेल. रविवारी एसी लोकल फेऱ्यांची संख्याही कमी असेल. आज फलटावर प्रवाशांची गर्दी असेल. दरम्यान काही स्टेशनवर बाहेरून मोर्चासाठी आलेल्या नागरिकांची गर्दीही दिसू शकते. यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे सोयीचे ठरेल.
