ShahajiBapu Patil : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमधी हाय…’ गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्येही शहाजी बापूंचीच चर्चा, व्हिडीओ समोर

शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याबरोबर बोलताना त्यांनी गुवाहाटीचा केलेल्या वर्णन आणि त्यांनी सांगितलेला आपला राजकीय प्रवास याची चर्चाही सोशल मीडियावर जोरदारपणे झाली आहे. तर यावेळी मात्र त्यांच्या या व्हिडीओची भूरळ थेट एकनाथ शिंदे यांनाच पडलेली दिसते.

ShahajiBapu Patil : 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमधी हाय...' गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्येही शहाजी बापूंचीच चर्चा, व्हिडीओ समोर
महादेव कांबळे

|

Jun 28, 2022 | 5:23 PM

मुंबईः शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Rebel MLA Shahaji Bapu Patil) यांच्या काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. सोशल मीडियावर (Viral Video) शहाजी बापू पाटील यांच्या या वाक्याने धूमाकुळ घातला असतानाच महाराष्ट्रापासून दूर असलेले आणि तरीही मनाने महाराष्ट्रात असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आणि त्यांच्यासोबतच्या सर्व आमदारांनाही या वाक्याची भुरळ पडली नसती तरच नवल होतं.

आज सकाळी सगळे आमदार हॉटेलच्या लॉबीत आले असतानाच त्यांनी शहाजी बापू पाटील यांचे त्यांनी मनापासून कौतुक केलं.

एकनाथ शिंदेंनी केली विनंती

यावेळी शिंदे यांनी बापूना हे त्यांचं सुपरहिट वाक्य पून्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली, तसेच हे वाक्य किती व्हायरल झाल आहे आणि त्याची लोकांनी गाणी तयार केलीत हेही देखील दाखवून दिलं आहे.

आमदारांनाही व्हिडीओची भूरळ

शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याबरोबर बोलताना त्यांनी गुवाहाटीचा केलेल्या वर्णन आणि त्यांनी सांगितलेला आपला राजकीय प्रवास याची चर्चाही सोशल मीडियावर जोरदारपणे झाली आहे. तर यावेळी मात्र त्यांच्या या व्हिडीओची भूरळ थेट एकनाथ शिंदे यांनाच पडलेली दिसते.

काय झाडी, काय डोंगरची फर्माईश

यावेळी आमदार शहाजी पाटील यांच्या त्या व्हिडीओची चर्चा एकनाथ शिंदे आणि तेथील आमदारांमध्येही झालेली दिसते. यावेळी त्यांना शहाजी बापू पाटील यांना त्या व्हिडीओतील काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल हा संवाद त्यांनी पुन्हा एकदा म्हणण्यासाठी सांगत असल्याचे दिसत आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें