नवनिर्वाचित आयुक्तांचे आधी फेटा बांधून स्वागत; नंतर विश्वनाथ भोईर म्हणतात, हे आपल्याच गटातील आहेत…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारले तेव्हा विश्वनाथ भोईर हे अगदी अयोध्या दौऱ्यापासून शिंदे यांच्यासोबत होते. त्यामुळे सर्वत्रच गटाटाच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय दहिकाल्यामुळे कोण कोणत्या गटात आहे, हे समजत नसलं तरी शिंदे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे.

नवनिर्वाचित आयुक्तांचे आधी फेटा बांधून स्वागत; नंतर विश्वनाथ भोईर म्हणतात, हे आपल्याच गटातील आहेत...
| Updated on: Jul 22, 2022 | 5:07 PM

मुंबईः शिंदे गटातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर (Rebel MLA Vishwanath Bhoir) यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (Kalyan-Dombivli Municipal Corporation) नवनिर्वाचित आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Commissioner Dr. Bhausaheb Dangde) यांची भेट घेत फेटा बांधून त्यांचं स्वागत करत रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदाचा डॉक्टर दांगडे यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर आता शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांची वैयक्तिक भेट घेत आहेत. आमदार भोईर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही दांडगे यांची भेट घेतली.

भोईरांचा आयुक्तांना इशारा

यावेळी भोईर यांच्याकडून त्यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आले. त्यानंतर भोईर यांनी आयुक्तांकडे इशारा केला आणि हळूच म्हणाले आणि हे आपल्या गटातील आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला होता, यावेळी आयुक्तांनाही या गोष्टीचे हसू आवरता आले नाही.

दुजाभाव केल्याचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारले तेव्हा विश्वनाथ भोईर हे अगदी अयोध्या दौऱ्यापासून शिंदे यांच्यासोबत होते. त्यामुळे सर्वत्रच गटाटाच्या राजकारणाला वेग आला आहे. राजकीय दहिकाल्यामुळे कोण कोणत्या गटात आहे, हे समजत नसलं तरी शिंदे गटात इनकमिंग जोरात सुरू आहे. कोणतेही आयुक्त रुजू झाले की, त्यांच्यावरून राजकीय पक्षात नेहमीच जुंपली जाते. दुजाभाव केल्याचा आरोपही याअगोदरच्या अनेक आयुक्तांवर झाला आहे मात्र आता खुद्द शिंदे गटातील आमदारानेच आयुक्त आपल्या गटातील असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आमदार विश्वनाथ भोईर यांनी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासोबत चर्चा देकील केली आहे.

मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ

चर्चा करताना महापालिका निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. एका प्रभागातील दोन ते तीन हजार मतदाराची नावे दुसऱ्याच्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही बाब गंभीर असून त्यावर आमदारांनी आयुक्तांनी लक्ष वेधले. त्याच बरोबर शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे, शहरातील कचरा, आरोग्य यंत्रणा, पावसाचे पाणी एकाही नागरिकांच्या घरात शिरणार नाही अशी दक्षता प्रशासनाकडून घेण्यात घ्यावी अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक रवी पाटील, विद्याधर भोईर, छाया वाघमारे, प्रभूनाथ भोईर, मयूर पाटील, हर्षदा थवील आदी उपस्थित होते.