AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर 25 लाख रुपये खर्चाचं प्रकरण, रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं ते ही सांगितलं

Mumbai Mayor Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं नाव सातत्याने कुठल्या ना कुठल्या वादामध्ये येत आहे. आता महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावामुळे ते वादात अडकले आहेत.

Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर 25 लाख रुपये खर्चाचं प्रकरण, रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं ते ही सांगितलं
Ritu Tawde
| Updated on: Aug 19, 2026 | 2:23 PM
Share

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचं नाव सातत्याने कुठल्या ना कुठल्या वादामध्ये येत आहे. आता महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाख रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे रितू तावडे अडचणीत आल्या आहेत. आज रितू तावडे यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं आहे. “महापौर होऊन मला दोन महिने झालेत. मागच्या दोन वर्षांपासून हे कॉन्ट्रॅक्ट महापालिकेत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ती कंपनी महापालिकेच्या प्रसार, प्रचाराचं काम करत आहे. माय BMC पोर्टलच्या माध्यमातून महापौरांचे दिवसभरातले प्रसार, प्रचाराचे फोटो दाखवले जातात. माझी एवढीच मागणी होती की, या ठिकाणी तुम्ही जी व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीची व्यवस्था पुरवता ती दिवसभर माझ्यासोबत राहिली पाहिजे. मी नक्कीच तशी मागणी केली होती” असं रितू तावडे यांनी कबूल केलं.

“महापौर त्यांच्या दालनापुरता मर्यादीत न राहता, मी ज्या-ज्या ठिकाणी जाते, लोकांना भेटते ते काम प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी मी पत्र दिलं होतं.हे जे टेंडर काढलं, त्याची मुदत वाढवा. हे काम कोणाला द्या, दुसऱ्याला द्या असं पत्र मी दिलेलं नाही. जी व्यवस्था आहे, मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जे काम चालू आहे, त्यात व्हिडिओग्राफर, फोटोग्राफरचा समावेश करुन घ्या अशी मागणी मी केली” असं रितू तावडे म्हणाल्या.

कुठल्याही गोष्टीत महापौरांचा हस्तक्षेप नाही

“सर्व महापौरांना ही व्यवस्था दिली जात होती. टेंडर याला द्या, मुदत वाढवा हे महापौरांनी पत्र देऊन सांगितलय का?. महापौरांचा या संपूर्ण प्रक्रियेत अजिबात हस्तक्षेप नाही. तांत्रिक दृष्ट्‍या जी काम देणारं आहात. त्यातली दोन माणसं महापौरांच्या व्यवस्थेसाठी लागतील. त्यासाठी पत्र लागेल असं मला सांगितलेलं, ते मी दिलं. त्याचं पण एवढ मोठं राजकारण केलं. कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झालेला. वारंवार महापौरांचं नाव लावून राजकारण करण्याचं काम बंद करा. मुंबईकरांना हे समजतय. कुठल्याही गोष्टीत महापौरांचा हस्तक्षेप नाही” असं रितू तावडे यांनी सांगितलं.

1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एक वर्षाच्या कालावधीसाठी 25 लाख 12 हजार 786 लाख रुपये महापौरांच्या प्रसिद्धीसाठी मुंबई महानगर पालिका खर्च करणार आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात