मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ नौकेला भीषण आग, तीन खलाशी बेपत्ता

ही आग इतकी मोठी होती की इंजिन रूमनेही पेट घेतला. यामद्ये तीन खलाशी बेपत्ता असून एक गंभीर जखमी असल्याची माहीती देण्यात आली आहे.

मुंबई हायजवळ 'रोहिणी' नौकेला भीषण आग, तीन खलाशी बेपत्ता

मुंबई : मुंबई हायजवळ ‘रोहिणी’ या नौकेला काल रात्री 8.50 ला मोठी आग लागल्याची माहिती देण्यात आली आहे. ही आग इतकी मोठी होती की इंजिन रूमनेही पेट घेतला. यामद्ये तीन खलाशी बेपत्ता असून एक गंभीर जखमी असल्याची माहीती देण्यात आली आहे. अधिक माहितीनुसार, जखमी खलाशाला ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरने मुंबईत आणण्यात आलं असून त्याला रुग्णालयात ऊपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Rohini boat catches fire near Mumbai High three sailors are missing)

मिळालेल्या माहितीनुसार, यामधून काही जणांना दुसऱ्या नौकेने रोहीनी या बोटीतून रेस्कू करण्यात आलं. मुंबईपासून 92 मैल सागरी अंतरावर ओएनजीसीची बॉम्बे हायअंतर्गत विस्तारित तेलविहीर आहे. या तेलविहिरीजवळ काम करणाऱ्या ‘रोहिणी’ या नौकेला शनिवारी आग लागली. त्यानंतर नौकेतील अधिकाऱ्यांनी तटरक्षक दलाच्या वरळीतील केंद्राकडे मदतीची विनंती केली. यावेळी ‘अल्बाट्रॉस’ हे व्यापारी जहाज जवळच होते. त्या जहाजाला तत्काळ घटनास्थळी जाण्याची विनंती तटरक्षक दलाने केली.

या जहाजाने दोरखंडाचा उपयोग करीत ‘रोहिणी’ नौकेला तेथून सुरक्षितस्थळी हलवले. याचदरम्यान तटरक्षक दलाने विशेष टेहळणी विमानही रत्नागिरीहून धाडलं. या विमानाने संपूर्ण स्थितीची माहिती घेत वरळीतील केंद्राला कळवली. त्यानुसार या केंद्राने ‘प्रिया’ ही लहान नौका तिथे धाडली.

या नौकेने ‘रोहिणी’च्या बाहेरील भागाची आग विशेष ‘कुलिंग’ प्रणालीने शांत केली. त्या मागोमाग ‘आयसीजीएस समर्थ’ ही नौका घटनास्थळी पाठवण्यात आली. ‘आयसीजीएस समर्थ’ने ‘प्रिया’ जहाजाच्या समन्वयाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘रोहिणी’च्या संपूर्ण इंजिनरूमने पेट घेतला असून धुरामुळे नौकेतील कर्मचारी हतबल होते.

यामुळे अखेर ‘आयसीजीएस समर्थ’मधील तटरक्षक सैनिकच भर समुद्रात नौकेवर गेले. ही आग विझवण्यासाठी त्यांचे सायंकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. हाती आलेल्या माहितीनुसार ही आग विझली असून सध्या बेपत्ता खलाशांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (Rohini boat catches fire near Mumbai High three sailors are missing)

संबंधित बातम्या – 

ठाकरे सरकारच्या नेत्यांनी काम धंदे सोडले, त्यांचा गुन्ह्यांमध्ये वेळ जातोय, निलेश राणेंचा हल्ला

Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

70 वर्षांच्या आजीबाईंकडे गावगाडा, कातकरी समाजातील शेवंतीबाई सरपंचपदी

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

(Rohini boat catches fire near Mumbai High three sailors are missing)

Published On - 11:14 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI