इथं सुरू होतो पैशांचा खेळ… MHT-CET परीक्षेतील घोळावर रोहित पवारांचा गंभीर आरोप
Rohit Pawar Allegation on MHT CET: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी MHT-CET परीक्षेतील घोळावरून पुन्हा आरोपांची राळ उडवून दिली. MPSC परीक्षेसह इतर स्पर्धात्मक परीक्षेतील गैरप्रकाराबाबत रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी MPSC परीक्षेतील अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नीट पुनर्परीक्षेतही मोठा घोळ झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी MHT-CET परीक्षेतील घोळावर आज पत्रकार परिषद घेत परीक्षा नियोजन आणि ज्या कंपनीला हे काम दिले होते. तिच्यावर मोठा गंभीर आरोप केला. ब्लॅकलिस्ट झालेल्या कंपन्यांना परीक्षा नियोजनाचे काम दिल्याचा आरोप त्यांनी आज केला. त्यांनी या संपूर्ण प्रकरणामागील क्रोनॉलॉजी काय आहे यावर भाष्य केले. त्यांनी या सर्व निकालाचे फोरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. विखे पाटील यांचा राजीनामा आम्ही लवकरच मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
हा सर्व पैशांचा खेळ
येथे सुरू होतो पैशाच खेळ, म्हणजे गरीब आई-वडील इकडून-तिकडून पैसे आण, तीन-चार लाख गोळा कर. मुलांना क्लासेस लाव. छपराच्याच घरात आई-वडील राहतात. मुलांचं शिक्षण करायचं असतं. माडी बांधू शकत नाहीत. मुलांना शिकवण्यासाठी आई-वडील मोठी गाडी घेऊ शकत नाही. मुलानं डॉक्टर इंजिनिअर व्हावं यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असतो. पैशांचा घोळ नेते आणि अधिकारी करतात. तिथे तो घोळ घालतात. त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात गोंधळ निर्माण होतो.
टेंडरमधील घोळावरून रोहित पवारांचे आरोप
२०११ मध्ये एज्यु पार्क या कंपनीची निविदा मंजूर झाली होती. त्यात सर्वात कमी बोली ही टीसीएसची होती. त्यावेळी तीनदा निविदा प्रक्रिया राबवली गेली. तीनही वेळेस टीसीएसची बोली सर्वात कमी होती. एज्युपार्कला पार्क कंपनी पात्र व्हावी यासाठी तीन वेळा टेंडर बदलण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. एज्युपार्कला टेंडर मिळाल्यानंतर त्यांनी हे काम पुढे मेरीटट्रॅक कंपनीला सोपवले. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर सरकारने मेरिटट्रॅक कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. तिथे या कंपनीने परीक्षेत घोळ घातला होता. आपल्याकडे एज्युपार्कने परीक्षा नियोजनाचे काम मेरिटट्रॅकला दिले आणि मोठी कमाई केली. याविषयीचे पुरावे आमच्याकडे आहेत. ब्यूरो ऑफ स्टँडर्डने ही कंपनी ब्लॅक लिस्टेड केली आहे. दोन्ही ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी या कंपनीला बंदी घालण्यात आलेली आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
रिंग करून मिळवले कंत्राट
eduspark कंपनीने रिंग करुन महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभाग, उच्च – तंत्र शिक्षण , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या विभागांमध्ये कंत्राट मिळवले आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही टार्गेट करत नाही मात्र भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संबंधित खात्याचे मंत्री याकरिता जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. इतके मुद्दे आता समोर आले आहेत की कुठल्या मुद्द्याना हात घालायचा असा सवाल त्यांनी केला. पेपर फुटी, सरकारी कामं, लाडकी बहीण यात घोटाळा होतं आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार होतं आहे. जर पोलिसांच्या पगारात देखील भ्रष्टाचार होतं असतील तर लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री यांची जबाबदारी असते की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली असली पाहिजे. पण गृहविभागातच घोटाळा होतं आहे. काही कंपन्या त्यात सुद्धा इतका भ्रष्टाचार होतं असेल तर मुख्यमंत्री यांची जबाबदारी असते, असे सांगायला ते विसरले नाहीत.
निकालाचे फोरेन्सिक AUDIT करा
Eduspark या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या ७ विभागांमध्ये काम मिळवले. एड्युसपार्क या कंपनीची चेन निर्माण करुन आपल्याच संबंधित कंपन्यांना काम दिले गेले. बिहार सरकारनं या संदर्भात थेट पंतप्रधानांना तक्रार केली आहे. कार्टेल करुन , कंपन्यांचा गट तयार करुन कंत्राटे मिळवली जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्यात MHT-CET निकालाचे फोरेन्सिक ऑडिट करणे गरजेचे आहे.
2023 पासूनच्या CET निकालाची Academic Corelation चेक करणे, सेटिंग करून देणाऱ्या संस्था, क्लासेस , एजंटचे जाळे शोधणे गरजेचे आहे. टेंडर प्रक्रियेची चौकशी करणे गरजेचे आहे. परीक्षा पूर्वीप्रमाणे OMR वर ऑफलाईन घ्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
सगळा काळाबाजार भाजप काळात झाला
उत्पादन शुल्क यात अधिकचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत, यांच्यात मार्किंग पॅटर्न लीक झालं होतं. एमपीएससीवर सगळ्यांचा विश्वास होता, तलाठीचा मुद्दा देखील आहे. विखेपाटील यांचा राजीनामा आम्ही लवकरच मागणार आहोत. हा सगळा काळाबाजार भाजप काळात झालेला आहे, असा आरोप पवार यांनी केला. 10 लाख विद्यार्थी बसतात, 2 वेळा पेपर होतो आणि रँक नुसार लिस्ट लावली जाते. आमच्या पदाधिकारी यांनी आमच्याकडे माहिती दिली, पहिली परीक्षा देणं बंधनकारक असतं, असे रोहित पवार म्हणाले.
पर्सेंटाईल काढण्याचे सूत्र दाखवा
सन 2020 ते 2026 या कालावधीत झालेल्या CET परीक्षेच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर 2023 नंतर एक ट्रेंड दिसून येतो. 2023 पासून CET च्या Top 100 विद्यार्थ्यांमध्ये बारावीच्या बोर्डात PCM मध्ये 85 % पेक्षा अधिक मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी घटत चालली आहे. MH-CET 2026 मध्ये Top 100 विद्यार्थ्यांपैकी केवळ 43 विद्यार्थ्यांना बारावीच्या बोर्डात PCM मध्ये 85% पेक्षा अधिक मार्क्स आहेत. एमएच सीईटी च्या परिक्षेत पर्सेंटाईल काझण्याचे सूत्र नेमके कसे? हे सीईटी कडून सांगण्यात येत नाही, आर टी आय अंतर्गतही ही माहिती दिली जात नाही. पर्सेंटाईल काढण्याचे सूत्र दाखवले जावे ही आमची मागणी असल्याचे पवार म्हणाले.
गुंगी गुडिया वक्तव्यावर म्हणाले काय?
सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने गुंगी गुडिया अशी टीका केला. यावर सकारात्मक किंवा नकारात्मक काहीही बोलू शकत नाही. गुंगी गुडिया असं म्हटलं आणि ते चुकीचं बोले आहेत असं अजित दादांच्या पक्षातील लोकांना वाटतं असेल तर चुकीचं नाही, असे पवार म्हणाले. इंदिरा गांधी यांना देखील गुंगी गुडिया म्हटलं जायचं. पत्रकारांशी संवाद साधला जात होता तेव्हा बीड मधल्या वाढत्या गुन्हेगारी बदल प्रश्न विचारला असता. तेव्हा आता तालुका स्तरावर असलेल्या एका नेत्याने वाईट पद्धतीने पत्रकाराला शांत बसायला लावलं जसे काय हेच गुंड आहेत. बीड मधले बहुतेक गुंड हे त्यांच्या ओळखीचे आहेत, एक मोठा गुंड जेल मध्ये आहे पण दमदाटी करून काल मुंडे कडून करण्यात आलं .आधी इंदिरा गांधी शांत होत्या तेव्हा, त्या काळात काही लोकांनी लिहिलं की नेहरू जी यांच्या सोबत जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या. पण जेव्हा त्या पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली तेव्हा आपण त्यांना पाहिलं असे रोहित पवार म्हणाले.
