देवेंद्र फडणवीसांना हात जोडून सांगितलं, माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ : संभाजीराजे

Sambhajiraje Chhatrapati : छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati)  यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. 

देवेंद्र फडणवीसांना हात जोडून सांगितलं, माझं-तुझं न करता समाजासाठी एकत्र येऊ : संभाजीराजे
Sambhajiraje Chhatrapati_Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 12:59 PM

मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati)  यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.  दुपारी 12.15 च्या सुमारास दोघांची भेट झाली. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) त्यांची भूमिका जाणून घेतली. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजता ही भेट नियोजित आहे. त्यानंतर संभाजीराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. (Sambhajiraje Chhatrapati meets Devendra Fadnavis discussed on Maratha reservation now going to meet CM Uddhav Thackeray today )

“मी देवेंद्रजींना सांगितलं की, मराठा समाजातील गरिबांची वाईट परिस्थिती आहे. समाज अस्वस्थ आहे. या समाजाला न्याय मिळवून दिला नाही तर आपण सर्वजण जबाबदार असू. आपण या समाजाला न्याय देण्यासाठी राजकारणापलिकडे पाहायला हवं. त्यासाठी मुख्यमंत्री – विरोधी पक्ष नेते यांनी सर्वांनी एकत्र यायला हवं. मी हात जोडून सांगितलं, विनम्रपणे सांगितलं माझं तुझं करण्यापेक्षा आपण एकत्र येऊ. आता आपण एकत्र आलो नाही आणि समाजाला न्याय दिला नाही  तर जे काही समाजाचं होईल, त्यासाठी माझ्यासह तुम्ही-आम्ही सर्व आमदार खासदार सर्व जबाबदार असतील”, असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

VIDEO : संभाजीराजे नेमकं काय म्हणाले? 

शरद पवार-राज ठाकरेंची भेट 

संभाजीराजेंनी काल शरद पवार आणि राज ठाकरे यांचीही भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर संभाजीराजे काय म्हणाले? 

राज ठाकरे यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जातपात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही त्यांची भूमिका आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे हे जीवलग मित्र होते. दोन्ही घराण्याचं मैत्रीचं नातं आजही काम आहे. राज आणि माझा कॉमन पाईंट आहे. किल्ल्यांचं संवर्धन आणि जतन करण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती संभाजीराजे यांनी राज यांच्या भेटीनंतर दिली.

पवारांच्या भेटीनंतर संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे.

शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन, अशी माहिती काल संभाजीराजेंनी दिली.

संभाजीराजे कोणती घोषणा करणार?

संभाजीराजेंनी 8-10 दिवसापूर्वीच आपण 27-28 मे रोजी भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार संभाजीराजे आज आपली भूमिका मांडणार असून, ते राज्यसभा सदस्यत्व अर्थात आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करु शकतात. त्याबाबत अधिकृत माहिती नसली, तरी राजकीय वर्तुळात या चर्चेने जोर धरला आहे.

संबंधित बातम्या  

संभाजीराजे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजीनामा देण्याची शक्यता

शाहू महाराज आणि प्रबोधनकार मित्र होते, राज आणि माझाही कॉमन पाईंट : संभाजीराजे छत्रपती

(Sambhajiraje Chhatrapati meets Devendra Fadnavis discussed on Maratha reservation now going to meet CM Uddhav Thackeray today )
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.