मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात फोनवर संवाद!, राज्यपालांच्या भेटीबाबत चर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीबाबत राज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात फोनवर संवाद!, राज्यपालांच्या भेटीबाबत चर्चा

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव वीज बिल आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी राज्यपाल महोदयांना एक निवेदनही दिलं आहे. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर आज राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरे आणि पवार यांच्यात चर्चा झाल्याचं समजतंय. (MNS chief Raj Thackeray and NCP chief Sharad Pawar phone conversation )

राज ठाकरे यांचा फोन आल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली. “राज ठाकरे यांचा फोन आला. भेटण्याबाबत काही ठरलं नाही. राज यांनी सांगितले की राज्यपालांनी आपल्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे”, अशी माहिती पवार यांनी दिली.

‘जिथे 2 हजार वीज बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. कुठली गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असं सांगितलं जातं, पण त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचंही राज ठाकरे राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले

लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे 17 ते १८ रुपये देतात आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 27 ते 28 रुपये दर मिळावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही – राज ठाकरे

राज्यात प्रश्न खूप आहेत. प्रश्नांची कमतरता नाही. कमतरता आहे ती फक्त निर्णय घेण्याची असं सांगतानाच निर्णय का घेतले जात नाहीत? कशासाठी हे सरकार कुंथत आहे? कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर ठाकरे सरकारवर टीका केली.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे सरसावले, दूध दराच्या मुद्द्यावरुन आक्रमक, राज्यपालांना लक्ष घालण्याची विनंती

राज्य सरकार अडलंय कुठं? धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा : राज ठाकरे

कुंथत कुंथत सरकार चालवता येत नाही, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

MNS chief Raj Thackeray and NCP chief Sharad Pawar phone conversation

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI