AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवाब मलिक यांच्या जावायाला जेलमध्ये पाठवल्याच्या रागातून…’, वकिलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Sameer Wankhede Latest News : समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी आज सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन आणि एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या कारवाईवर मोठा दावा केला.

'नवाब मलिक यांच्या जावायाला जेलमध्ये पाठवल्याच्या रागातून...', वकिलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
| Edited By: | Updated on: May 19, 2023 | 6:13 PM
Share

मुंबई : एनसीबीचे मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जावायाला जेलमध्ये पाठवल्याचा रागातून सुडबुद्धीने समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे, वानखेडेंवर 25 कोटींच्या खंडणीचे आरोप केले जात आहेत, असा मोठा दावा वकील रिझवान मर्चंट यांनी केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई कोर्टात रिट याचिका दाखल केलेली. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली आणि कोर्टाने 22 मे पर्यंत वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिलं. या सुनावणीनंतर समीर वानखेडे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“नवाब मलिक यांच्या आरोपांवरुन सुडबुद्धीवने कारवाई सुरु आहे. नवाब मलिक यांचे आरोप खोटे आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला जेलमध्ये पाठवल्याच्या रागातून हे आरोप करण्यात आले आहेत”, असा मोठा दावा समीर वानखेडे यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला.

“समीर वानखेडे यांच्या घरांवर छापे टाकले ते बेकायदेशीर आहे. नवाब मलिक यांनी चुकीचे आरोप केले तेव्हापासून हे सुरू झाले. त्यांच्या जावयाला अटक केल्याने त्यांनी 25 कोटींचा आकडा बोलला. लाच घेणारा गुन्हेगार असतो. तसेच लाच देणाराही असतो. तक्रारीचा ड्राफ्ट बदलला, गायब केला हे नियमांचे उल्लंघन आहे. ज्ञानेश्वर सिंह यांना चौकशीला समोर जावं लागेल. 4 महिन्यात चौकशी होणे अपेक्षित मात्र 2 वर्षांनी एफ आय आर दाखल होते”, असं वकील रिझवान मर्चंट म्हणाले.

“नवाब मलिक यांनी चुकीचे वक्तव्य केले. त्यांनी 25 कोटींच्या खंडणीचे आरोप केले. कारण समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांच्या जावायाला अटक केली होती. समीर वानखेडे यांनी मलिकांच्या जावायाला अटक केली नसती तर 25 कोटींचे आरोप समोर आले नसते. ज्ञानेश्वर सिंह यांनी नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या आरोपांपासून तपासाला सुरुवात केली होती”, असा दावा मर्चंट यांनी केला.

वकील रिझवान मर्चंट आणखी काय म्हणाले?

“ही संपूर्ण केस बेकायदेशीर आहे. चार महिन्याच्या आता ज्या तारखेला पब्लिक सरवंटने एक चुकीचा निर्णय घेतला होता, त्या चुकीच्या निर्णयावरुन डिपार्टमेंटला लागतंय की, या प्रकरणी भ्रष्टाचाराचे कायदे लागू शकतात. कार्डिलिया केस हे 2021 ची आहे. एफआयआरमध्ये कपिल नावाच्या व्यक्तीची तक्रार आहे”, असं वकिलांनी सांगितलं.

“कोर्टाने प्रकरण 22 तारखेपर्यंत तहकूब केलंय. पण आम्ही विनंती केली की, समीर वानखेडे हे सीबीआयच्या चौकशीसाठी नियमितपणे सीबीआयच्या कार्यालयात जातील. त्यांनी 41 एची नोटीस दिली आहे. या नोटीस अंतर्गत जर व्यक्ती चौकशीला सामोरं जातात तर त्यांना अटक होत नाही”, असं देखील वकिलांनी सांगितलं.

“सीबीआयवर आम्हाला शंका आहे. कारण कोणतंही कारण समोर करुन समीर वानखेडे यांना अटक केलं जाऊ शकतं. त्यामुळे आम्ही सीबीआयला विनंती केली की, सेक्शन 41 A3, 41 (3),(4) ला एकत्र करु नये. कोर्टाने याबाबतची विनंती स्वीकारली आहे. सीबीआय 22 मे पर्यंत समीर वानखेडे यांना अटक करु शकणार नाही. एनसीबी 22 तारखेला प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करणार. त्यानंतर व्हेकेशन जजच्या समोर सुनावणी पार पडेल”, अशी माहिती वकिलांनी दिली.

“याचिकेत समीर वानखेडे यांचे एनसीबी अधिकारी ज्ञानेश्वर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यासोबतचे संभाषण जोडण्यात आले आहेत. तुमचा प्रश्न आहे की, शाहरुख खानसोबतचे संभाषण समोर का आले आहेत? तर आर्यन खानची जेव्हा जेलमधून सुटका झाली तेव्हा आपली एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याविषयी तक्रार नाही, असं म्हटलं होतं. पण सोशल मीडियावर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत”, असं वकील मर्चट म्हणाले.

“शाहरुख खान एक बाप म्हणून विनंती करत होता. त्यामध्ये पैशांसंबंधी काहीच संभाषण झालेलं दिसत नाहीय. तसं असतं तर ते संभाषणात दिसलं असतं. ज्ञानेश्वर सिंह आणि समीर वानखेडे दोघांबरोबर शाहरुख खानचे चॅट आहेत. मागे याचिकेत त्यांनी अधिकाऱ्यांनी पैसे मागितले नाही, असे नमूद केले होतेय. चॅटमध्ये शाहरुख खान वानखेडे यांना प्रामाणिक अधिकारी म्हणत आहेत. तर ज्ञानेश्वर यांच्या बरोबरच्या चॅटमध्ये आक्षेपार्ह मजकूर आहे. ज्ञानेश्वर यांच्या सुचनेनुसारच कृती केली गेली आहे”, असा दावा वकिलांनी केला.

“नोट- गुन्ह्याची प्राथमिक माहिती दिलेला गायब झाला आहे. तेव्हा एनसीबी मध्ये वानखेडे नव्हते. ती कोणी गायब केली, का केली, याची सीबीआयला चौकशी करावी लागेल. कलम 27 एवढा गंभीर नाही, कारण नांगरे पाटील यांनी अटक केलेली मुलं व्यवस्थित जगत आहेत. आर्यन विरोधात आमचे काहीही नाही. मात्र एनसीबी चे नियम मोडले आहेत. ते थांबले पाहिजेत”, असं वकील रिझवान मर्चंट म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.