सोशल मीडियावर व्हायरल झालेला जन्माचा दाखला खोटा, कोर्टात चॅलेंज करणार; समीर वानखेडेंचा इशारा

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. (sameer wankhede says viral birth certificate is fake)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला जन्माचा दाखला खोटा, कोर्टात चॅलेंज करणार; समीर वानखेडेंचा इशारा
Sameer Wankhede
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 11:58 AM

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून वानखेडे प्रचंड संतापले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे, असा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे.

समीर वानखेडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. माझा म्हणून जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे. माझ्याविरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. त्याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं.

मलिक यांचं ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांचा जन्म दाखला ट्विटरवर पोस्ट केला आहे. नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे हे जातप्रमाणपत्र शेअर करत आणखी एक पोलखोल केली आहे. अजून काही पुरावे नवाब मलिक समोर आणणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. एनसीबीच्या बोगस कारवाईवर आणि आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या समीर दाऊद वानखेडे याच्या मनसुब्यावर नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक पुरावे सादर करत नवाब मलिक यांनी आर्यन खान अंमली पदार्थ कारवाई कशी बोगस आहे आणि आघाडी सरकारला कसं बदनाम केलं जातंय हे पत्रकार परिषद घेत समोर आणले होते.

वानखेडेंची सरकारी वकिलांशी चर्चा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडेंबाबत अनेक माहिती पुढे येत आहे. तसेच त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून आरोपही केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर वानखेडे आणि एनसीबीचे विशेष सरकारी वकील यांच्या चर्चा सुरू आहे. विशेष सरकारी वकील यांच्या दालनात चर्चा सुरू आहे. गुन्हा क्रमांक 94/21 बाबत ही चर्चा सुरू आहे. या गुन्ह्या बाबत समाज माध्यमावर सतत चर्चा सुरू आहे. अनेक पंचांची नाव उघड होत आहेत, एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप होत आहे, या पार्श्वभूमीवर कोर्टाला काय माहिती द्यायची याबाबत चर्चा सुरू आहे. या गुन्ह्याबाबत सोशल मीडियावर आणि ज्या काही तक्रारी होत आहेत, त्याचा परिणाम या गुन्ह्याच्या तपासावर होऊ नये, कारवाईवरही परिणाम होऊ नये, याबाबत चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर एक सविस्तर निवेदन विशेष एनडीपीएस कोर्टात सादर केलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित बातम्या:

 शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

RTPCR कोडवर्ड वापरुन क्रूझवर प्रवेश, पार्टी सुरु होताच छापा, समीर वानखेडेंची पुन्हा डॅशिंग कामगिरी

‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

(sameer wankhede says viral birth certificate is fake)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.