महायुतीकडून आदित्य ठाकरे विरोधात उमेदवार निश्चित, या उमेदवारास मिळाले ग्रीन सिग्नल
sandeep deshpande mns: संदीप देशपांडे राज ठाकरे यांचे विश्वासू सरदार म्हणून ओळखले जातात. मनसेची भूमिका सातत्याने ते सोशल मीडिया आणि माध्यमातून मांडत असतात. वेगवेगळी आंदोलने करुन ते चर्चेत असतात.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील पक्षांनी विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एकीकडे लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण सुरु असताना विधानसभेचा आखाडा ठरवला जात आहे. बड्या नेत्याविरोधात चर्चेतील उमेदवार उतरवण्याची चाचपणी सुरु आहे. त्याचवेळी शिवसेना उबाठामधील दिग्गज नेते आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी महायुतीने तयारी सुरु केली आहे. आदित्य ठाकरे विरोधात वरळी विधानसभेतील उमेदवार ठरला आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे नेते संदीप देशपांडे आव्हान देणार आहे. त्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिले आहे. यामुळे आता आदित्य ठाकरे विरोधात संदीप देशपांडे अशी लढत रंगणार आहे.
आदित्य ठाकरे यांना संदीप देशपांडे देणार आव्हान
लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीकडून पराभवाचे चिंतन होत असताना विधानसभेची रणनीती तयार केली जात आहे. लोकसभेनंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. महायुतीमधील राज ठाकरे यांचा मनसे पक्ष विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. मुंबईतील वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे आव्हान देणार आहे. राज ठाकरे यांच्याकडून संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा लढवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
बॅनर लावून शक्ती प्रदर्शन
मनसे नेते संदीप देशपांडे यांना ग्रीन सिग्नल मिळताच त्यांची तयारी सुरु आहे. मनसेकडून वरळी विधानसभेत ठीक ठिकाणी बॅनर लावून करण्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी मनसे निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वीच तयारीला लागली आहे. लोकसभेत एकत्र असलेली महायुती विधानसभेत एकत्र असण्याची शक्यता आहे. मनसे महायुतीत २० जागांची मागणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहेत संदीप देशपांडे
संदीप देशपांडे राज ठाकरे यांचे विश्वासू सरदार म्हणून ओळखले जातात. मनसेची भूमिका सातत्याने ते सोशल मीडिया आणि माध्यमातून मांडत असतात. वेगवेगळी आंदोलने करुन ते चर्चेत असतात.
