Sanjay Raut: जो पेजेला देणार, त्याच्या शेजेला जाणार… पक्ष सोडणाऱ्यांवर राऊतांची विखारी टीका, अमोल कोल्हेंबाबत म्हणाले काय?
Sanjay Raut on Amol Kolhe: शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी फडणवीसांचे कौतुक केले आणि ऑफर आली तर विचार करेल असे वक्तव्य केले. त्यानंतर आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर विखारी टीका केली आहे.

Sanjay Raut on Amol Kolhe: शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोडकौतुक केलेच, पण जर ऑफर आली तर विचार करेल असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया ताणल्या आहेत. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी कोल्हेविषयी मोठे वक्तव्य केले. त्यांच्यावर विश्वास दाखवला. तर त्याचवेळी पक्ष सोडणाऱ्यांवर अत्यंत विखारी टीका केली. त्यातून त्यांचा संताप पुन्हा उसळला. मी असं काही म्हटलो की माझ्यावर शिवीगाळ करण्याचा आरोप होतो, हे सांगायला ही राऊत विसरले नाहीत.
अमोल कोल्हे यांच्याविषयी विश्वास
मी त्यांना ओळखतो ते छत्रपती संभाजी राजांची भूमिका करतात सध्या महात्मा फुले यांच्या भूमिकेत आहेत. छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्म भावनेने विचार करणार नाही याची माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्याला खात्री वाटते. त्यांनी भूमिका मांडली असेल तर महायुतीमध्ये कोण आहे का किंवा हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी बेईमानी करणाऱ्या मिंध्यांच्या गटात कोणी जाणार आहे का? जर ते जाण्याचा विचार हे करत असतील किंवा त्यांना सुद्धा इतिहास धर्मद्रोही हिंदूद्रोही म्हणून त्यांची गणना केली जाईल. ते शिवसेनेबरोबर होते, तेव्हा त्यांनी शिवसेनेत निष्ठेने काम केले तेव्हा त्यांच्याबरोबर ते काम करतात आणि कोल्हे यांना निवडून आणण्यामागे त्या भागातल्या हजारो शिवसैनिकांची मेहनत आहे. हे जिल्हाप्रमुख आहेत पुण्यातले, आमचे रामदास आबा घनवडे यांना विचारा, निवडून आणण्यामध्ये मतदारसंघातील शिवसैनिकांचा मोठा हात आहे. अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. ते आमचे लाडके संभाजी महाराज आहेत पडद्यावरचे. त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांनी जरी असे वक्तव्य केले असेल तरी ते मूळ पक्षात राहतील माझ्या मनात शंका नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
जो पेजेला देणार, त्याच्या शेजेला जाणार
बंडखोरांवर टीका करताना काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा देहविक्रीचा प्रकार असल्याचे भाष्य केले होते. तोच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी जो पेजेला देणार, त्याच्या शेजेला जाणार अशी जहरी टीका पक्ष सोडणाऱ्यांवर केली. त्यांचं DNA एकदा test करावं लागेल. या सगळ्यांचं की खरोखर यांच्या अंगात महाराष्ट्र रक्त आहे की नाही का? भेसळ आहे. operation तुतारी करताय. मग operation आमच्या पक्षाच्या tiger वगैरे नावं देऊ नका. हे operation लांडगे आहेत. हे कोल्हे आहेत. आणि बेसावध ठेवून तुम्ही अशा प्रकारची कामं करताय. सत्यता वापर करून यात कुठलं शौर्य आहे? राज ठाकरे जे बोललेलं आहे ते अत्यंत योग्य आहे. दोन्ही बाजूंनी आहे ते माल विकत माल विकायला तयार आहे ना? माल विकण्यासाठी आधी तयार केला जातो. सचिन अहिर यांचा काय झालं? सचिन अहिर यांचा काय झालं? इकडचे आमचे खासदार आहेत त्यांना फोडल्याचं बक्षीस म्हणून त्यांना उपसभापती झालं. पक्षात राहून त्यांनी हे केलं. ते शिंदे गटात गेले, अशी टीका राऊतांनी केली.
ऑपरेशन कमळ होईल
एकदिवस यांचं ऑपरेशन होईल तर यांना कळणार नाही. ऑपरेशन कमळ होईल, असा इशाराही राऊतांनी दिला. मी बोललो की म्हणतात संजय राऊत शिव्या देतो. ज्यांना जी भाषा कळते त्यांना त्याच भाषेत बोलावं लागतं. राज ठाकरेंनी राजकारणातला सध्याचं वास्तव सांगितलं. पेजेला देईल त्याच्या सेजेला जाण्याची औलाद आहेत. आम्ही आमदार खासदारांना मुला सारखं सांभाळलं. त्यांनी डोळा मारला तिकडे गेले. लफडं तरी निट करा राजकारणात, असे म्हणत काही वाचलं नाही फोडायला तर मोदी-शाह आपलाच पक्ष फोडतील, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी हाणला.