AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर माजी सहकाऱ्याची टीका; म्हणाले, यावरून त्यांची…

Rahul Gandhi Reservation Statement : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत एक विधान केलं आहे. अमेरिकेत बोलताना राहुल गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केलं. त्यावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. माजी काँग्रेस नेत्याने राहुल गांधींवर टीका केली आहे. वाचा सविस्तर...

राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबतच्या विधानावर माजी सहकाऱ्याची टीका; म्हणाले, यावरून त्यांची...
राहुल गांधी, काँग्रेस नेतेImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 11, 2024 | 12:25 PM
Share

जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी अमेरिकेतील एका कार्यक्रमात काल म्हणाले होते. त्यावर त्यांचे माजी सहकारी, माजी काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी अमेरिकेत वक्तव्य केले आहे. भारत जेव्हा न्याय ठिक होईल तेव्हा ते आरक्षण संपवतील, यावरून त्यांची मानसिकता समजते. काँग्रेस पक्ष आरक्षणविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे राजकारण करतात ते राहुल गांधींच्या या विधानाशी सहमत आहेत का? महाराष्ट्रात आरक्षण हा मोठा प्रश्न आहे, मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत आहे का, हा प्रश्न आहे, असं संजय निरूपम म्हणालेत.

राहुल गांधींवर निशाणा

1978 मध्ये मंडल समिती स्थापन झाली. काँग्रेसने 10 वर्षे मंडल आयोग रिपोर्ट लागू केला नाही. मंडल आयोगाचा अहवाल1979 मध्ये लागू झाला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजप आणि एनडीएवर खोटे आरोप केले. राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर जाऊन भारताविरोधात बोलू नये, असंही संजय निरूपम म्हणालेत.

राहुल गांधी यांनी भारतविरोधी अमेरिकन खासदाराचीही भेट घेतली आहे. काही अमेरिकन खासदार काश्मीरबाबत भारताच्या हिताच्या विरोधात प्रचार करतात. बांग्लादेशात जे काही झाले ते आरक्षणाच्या विरोधात झाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशातील तरुण भडकले. काँग्रेस पक्ष भारतात आरक्षणाच्या विरोधात असे काही षडयंत्र करत आहे का? कारण राहुल गांधी अशा लोकांना अमेरिकेत भेटत आले आहेत. राहुल गांधी यांनी सुराणी महिलेची भेट घेतली आहे. ती जगातील मुस्लिम देशांची प्रिय आहे, असंही निरूपम म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

महाराष्ट्रात निवडणुकीचा टप्पा सुरू झाला आहे. त्यामुळे असे सर्वे येतच राहतील, बहुतांश सर्वे बनावट आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची शंका व्यक्त केले आहेत, असंही संजय निरूपण म्हणालेत.

Follow Us
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?