ज्ञानेश कुमारांमुळेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा निवडणूक जिंकले; राऊतांचा खळबळजनक दावा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी निवडणूक जिंकली. राऊत यांनी याला 'व्होट चोरी' संबोधत ज्ञानेश कुमार यांच्या तातडीने हकालपट्टीची मागणी केली.

ज्ञानेश कुमारांमुळेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा निवडणूक जिंकले; राऊतांचा खळबळजनक दावा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 11:22 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक रद्द केली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनीही काल तशीच मागणी केली आहे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.

भाजप आणि शिंदे गटाने ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून व्होट चोरी केली आहे. इलेक्शन चोरी केली आहे. ज्ञानेश कुमार सारखी माणसे देशाचे दुश्मन क्रमांक एक आहेत. ज्ञानेश कुमार यांनी लोकशाहीचा कत्तलखाना केला आहे. त्यांनी लोकशाहीची धिंडवडे काढले आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. त्यांना बरखास्त केलंच पाहिजे. सरकारला त्यावर निर्णय घ्यावाच लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

राजीनामा का देणार नाही?

जंतरमंतर नंतरच्या भारताकडे मी पाहतो. आधीचा भारत जो आहे, तो झुकूंगा नही वाला होता. आता तसं नाहीये. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामाही घेणार नव्हते. संसदेवर लाखो लोक धडकले तेव्हा राजीनामा घ्यावा लागला. ज्ञानेश कुमार का राजीनामा देणार नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

छोटा शकील कोण?

तेलंगणाचे निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला. त्यांना अटक होणार होती. तेव्हा अमित शाहांनी घाईघाईने संसदेत बिल आणून निवडणूक आयुक्तांना अटक करता येणार नाही अशी तरतूद करून घेतली. तेव्हा खासदारांनी विरोध केला होता. त्यावेळी 110 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. निवडणूक आयुक्तांना वाचवण्यासाठी हे केलं गेलं. माफियागिरीला संरक्षण देण्यासाठी बिल आणलं होतं. हे छोट्या शकीलला वाचवण्यसाठी केलं. मोठा शकील कोण? हे तुम्ही बघा, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.

लिहून ठेवा…

मी तुम्हाला या क्षणी सांगतो, ज्ञानेश कुमार यांना जावं लागेल. काय होतंय ते तुम्ही पाहा. अमित शाहांच्या छोट्या शकीलला जावं लागेल. माझ्या वाक्याखाली अंडरलाईन करून ठेवा. अमित शाहांच्या छोट्या शकीलला जावं लागेल. त्यांची पापं भविष्यात उघड होतील. खटले चालवले जातील, असा दावाही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us