AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानेश कुमारचा खापर पणजोबा होता का? संजय राऊत संतापले; महाभियोग आणणार?

संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फॉर्म सहामध्ये बदल करून त्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचा दावा राऊत यांनी केला. राऊतांनी ज्ञानेश कुमार यांना 'माफिया' संबोधत त्यांच्या विरोधात संसदेत महाभियोग आणण्याची घोषणा केली आहे.

ज्ञानेश कुमारचा खापर पणजोबा होता का? संजय राऊत संतापले; महाभियोग आणणार?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2026 | 10:43 AM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सहामध्ये बदल केला. हा बदल करून तुझा आजोबा जिवंत होता का? खापर पणजोबा होता का? असं विचारत आहेत. आमचे पणजोबा, खापर पणजोबा विचारता, तुमचे खापर पणजोबा होते का? असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्ञानेश कुमार यांना केला आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. नैतिक शब्द त्यांना शोभत नाही. त्यांच्या विरोधात आम्ही राज्यसभा आणि लोकसभेत महाभियोग आणणार आहोत. त्यांना बडतर्फ करण्यासाठी खासदारांच्या सह्या घेणार आहोत, असं सांगतानाच ज्ञानेश कुमार हा घटनात्मक पदावर बसलेला माफिया आहे. मी जबाबदारीने बोलतो. त्यांचा बॉस म्हणजे अमित शाह आहेत. निवडणूक आयोग राहिलेलाच नाही. त्यामुळे त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे. त्यांची संघटीतपणे गुन्हेगारी केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर मकोका लावला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

म्हणजे हुकूमशाही नव्हे

आमच्यात मतभेद आहेत. पण आम्ही बहुमतानेच निर्णय घेतो, असं ज्ञानेश कुमार यांनी काल म्हटलं होतं. त्यावरही राऊत यांनी टीका केली आहे. मतभेद असणं म्हणजे 13 कोटी मतदारांची नावे हुकूमशाही पद्धतीने डीलिट करणं असं होत नाही. दोन निवडणूक आयुक्तांनी विरोध केला आहे. सहमती असेल तर एक विरुद्ध दोन आहे ना? ज्या गोष्टीवर असहमती आहे, ती फेटाळली जावी आणि बहुमतांनी ती गोष्ट व्हावी, यासाठी तिघांचा निवडणूक आयोग तयार केला आहे, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधलं.

हा गृहमंत्र्यांचा छोटा शकील

दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यात 14 वेळा आक्षेप घेतले. तरीही ज्ञानेश कुमार यांनी फॉर्म सहामध्ये बदल केले आहेत. फॉर्म सहामध्ये बदल करून तुमचा आजोबा होता का? तुमचा खापर पणजोबा होता का? असे प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही विचारतोय, तुमचा पणजोबा होता का? तुमचा खापर पणजोबा होता का?, असा सवाल करतानाच हा गृहमंत्र्याचा छोटा शकील आहे. शॉर्पशूटर आहे. हे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत. मी सोप्या भाषेत सांगितलं. तुम्हाला आवडणार नाही. पण सांगितलं, असं राऊत म्हणाले.

पुन्हा निवडणुका घ्या

ज्ञानेश कुमार नावाच्या व्यक्ती विरोधात निवडणूक आयोगातच बंड झालं आहे. हे बंड साधं नाहीये. हे महाशय सरकारचा एजंट म्हणून काम करत आहेत. निष्पक्ष काम करत नाही. बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या तिन्ही निवडणुका भाजप जिंकू शकला ते फक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या कारनाम्यामुळे. काल उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी यांनी या तिन्ही राज्यातील निवडणुका पुन्हा घेण्याची मागणी केली आहे, असं ते म्हणाले.

हा लोकशाहीचा कत्तलखाना

भाजप आणि शिंदे गटाने ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून जो अपहार केला ती व्होट चोरी आहे. इलेक्शन चोरी आहे. ज्ञानेश कुमार सारखी माणसे देशाचे दुश्मन क्रमांक एक आहेत. त्यांचा बॉस अमित शाह आहे. ज्ञानेश कुमार हा अमित शाहांचा माणूस आहे. हे माफिया रॅकेट निवडणूक आयोगात चालवलं जातंय. हा लोकशाहीचा कत्तलखाना आहे. सध्याचा निवडणूक आयोग लोकशाहीचा कत्तलखाना आहे. तो बंद करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षाने रस्त्यावर उतरावं लागेल, असंही ते म्हणाले.

Follow Us
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?