AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फिरायला येऊ नका… शेजारच्या देशाने जारी केले आदेश; पुन्हा महासंकट?

नेपाळमध्ये पुन्हा महासंकटाची चाहूल लागली आहे. 25 ते 27सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा धोका असल्याने नेपाळ पर्यटन विभागाने सुरक्षा सल्ला जारी केला आहे. विशेषतः नद्या आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे. मागील जलप्रलयात अनेकांनी जीव गमावला होता. पर्यटकांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आता फिरायला येऊ नका... शेजारच्या देशाने जारी केले आदेश; पुन्हा महासंकट?
Nepal travel advisoryImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 23, 2026 | 5:23 PM
Share

संकटातून कसंबसं सावरणाऱ्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा महासंकट घोंघावताना दिसत आहे. त्यामुळेच नेपाळच्या पर्यटन विभागाने सुरक्षा अॅडव्हायजरी जारी केली आहे. नेपाळमध्ये फिरायला येण्याचा प्लान करत असाल तर येऊ नका. 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक भागात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही नेपाळमध्ये येणं टाळा. खासकरून नदी आणि डोंगराळ भागात येऊ नका, अशा सूचनाच नेपाळच्या पर्यटन विभागाने (Nepal Travel Advisory) दिल्या आहेत. हवामान विभागाच्या अंदाजाचा हवाला देऊन पर्यटन विभागाने या सूचना जारी केल्या आहेत.

26 ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये जलप्रलयाने प्रचंड हाहा:कार माजवला होता. या जलप्रलयात 1451 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 5705 लोक बेपत्ता झाले होते. यात 636 विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. मंगळवारी जल विज्ञान आणि हवामान विज्ञान विभागाने शुक्रवार आणि रविवारपर्यंत पूर्व कोशी, दक्षिणी मधेश, मध्य बागमती आणि पश्चिम सुदूरपश्चिम प्रांतातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असून अलर्ट जारी केला आहे. कर्णाली, गंडकी आणि लुंबिनीसहीत पश्चिम प्रांतात विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

सूचना काय आहेत?

अतिवृष्टीचा धोका असल्याने एनटीबीने ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. नदी, डोंगराळ भाग, उंच भागाच्या ठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये, असं आवाहन एनटीबीने केलं आहे. पर्यटकांनी या भागात अतिरिक्त सावधानता बाळगण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. हवामान वेगाने बदलत आहे. उंच भागात बर्फवृष्टी होऊ शकते. भोटे कोशी आणि त्रिशुली नदी परिसरात आलेल्या महापुरात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळेच एनटीबीने पर्यटकांना प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाची माहिती घेऊनच बाहेर पडावे. रस्ते, फ्लाईट, ट्रेकिंग रुट आदींच्या स्थितीची माहिती घेऊनच नेपाळमध्ये या, असं एनटीबीने म्हटलं आहे.

विनाकारण फिरू नका

हवामान खराब असेल तर विनाकारण बाहेर फिरू नका. ज्या भागाला अधिक धोका आहे, अशा भागात जाणं टाळा. नदी, तलाव, दऱ्या, डोंगराळ भाग, उंच भाग आणि भूस्खलन होणाऱ्या परिसरात जाताना सावध होम्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट