Sanjay Raut: ते आमदार लवकरच भाजपात जाणार, संजय राऊतांचा मोठा बॉम्ब, थेट आकडाच सांगितला, कोणत्या पक्षाला पडणार खड्डा?
Sanjay Raut On NCP and BJP: राज्यातील राजकारणावर भाजपाच्या वरचष्माकडे इंगित करत खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यांनी भाजपमध्ये महायुतीमधील मित्र पक्षातील किती आमदार प्रवेश करणार आहेत, याचा थेट आकडाच जाहीर केला. त्यांच्या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Sanjay Raut On NCP and BJP: राज्यातील राजकारणात पुन्हा महाभूंकप येण्याचा दावा उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेतील किती आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याचा थेट आकडाच त्यांनी जाहीर केला. हा पक्ष प्रवेश कधी होणार याचे मोठे संकेतही त्यांनी दिले. राऊतांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यापूर्वी सुद्धा संजय राऊत यांनी असाच दावा केला होता. ते वारंवार हा दावा करत आहेत, तर त्याला भाजपच्या गोटातून उत्तर देण्यात येत आहे.
मी वारंवार हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे आणि सुनेत्रा ताई पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा ताई पवारांचे ते सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षानं का बोलावं हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिलं, कोणती पद दिलं हा त्यांचा विषय आहे असे खासदार संजय राऊत म्हणाले.
दोन्ही पक्षातील एकूण 50 आमदार भाजपात
पण भविष्यामध्ये या पक्षातील 25-30 आमदारांसह हा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे मी आताच तुम्हाला सांगत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील तितकेच आमदार, म्हणजे 25 -25 आमदार हे भाजपमध्ये जातील. हे आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा ताईंचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावंच लागेल असा दावा राऊतांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
याचवेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि निशाणी कुणाची यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकल्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतील आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला आहे.