AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: ते गद्दारांना प्रतिष्ठा देतायेत… शिंदे -पवारांच्या भेटीवर राऊतांची सणसणीत चपराक, महाविकास आघाडीत बिघाडी?

Sanjay Raut on Sharad Pawar-Eknath Shinde Visit: शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर खासदार संजय राऊत कमालीचे अस्वस्थ दिसले. त्यांनी या दोघांच्या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा होत आहे.

Sanjay Raut: ते गद्दारांना प्रतिष्ठा देतायेत... शिंदे -पवारांच्या भेटीवर राऊतांची सणसणीत चपराक, महाविकास आघाडीत बिघाडी?
संजय राऊत, शरद पवार, एकनाथ शिंदे
| Updated on: Jul 09, 2026 | 11:01 AM
Share

Sanjay Raut on Sharad Pawar-Eknath Shinde Visit: शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत. आदरणीय नेते आहेत. पण एखाद्या ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं ज्या गद्दारांना आपलं सरकार पाडलं त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणे त्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासाहर्ता घसरते आणि ती कमी होते अशी सणसणीत प्रतिक्रिया संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. काल शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि बंद दाराआड त्याच दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उभं केलंच पण नाराजी सुद्धा जाहीर केली.

शरद पवार यांच्यावर थेट निशाणा

शरद पवार मोठे नेते आहेत आदरणीय आहेत पण ज्या एकनाथ शिंदे यांनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली कीड लावली अख्खं विधानभवन का ओसं पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे. समोर वाय. बी. प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्ताच हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही. आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचा आहे त्यांनी ते करावं. पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना तर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासारखा कमी होते.  आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवार यांच्या दालनात आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती आणि त्या दृष्टीने त्यांनी शरद पवार यांच्याशी बेइमानी केली हे आम्ही लक्षात ठेवले असते. महाविकास आघाडीतल्या अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. असे खासदार राऊत म्हणाले.   सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलावलं होतं. मला सांगा ना तुम्ही? आम्ही त्यातले पार्टी आहोत,  असे सांगत संजय राऊत यांनी या घाडमोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा राबवायचा त्याच्यामध्ये मूळ तुमची पेक्षा जास्त किमतीने तो प्रकल्प पुरा करायचा हे जनतेच्या पैशातले दोन पाचशे कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा. टीव्हीचे कॅमेरे लावायचे आमच्यासारखे कोणीच नाही असं सांगायचं आणि आम्ही नसतो त्या प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदन करायची जनतेला मूर्ख बनवायचं आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे मतदान पडतात आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली मग ते समाज माध्यमांवर असेल वृत्तपत्रात असेल टीव्हीला असेल तर जनतेला भाडे ते तट्टू डॉग, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतात, असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला.

हे सुलतानाच राज्य आहे आणि सुलताना बरोबर अजून वाटली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सुलतानशाही आहे म्हणे महाराष्ट्र बदनाम करणारा सोडणार नाही . महाराष्ट्राच्या बदनामीच सगळ्यात मोठे षडयंत्र कोणी रचला असेल तर त्या अमित शहा यांनी रचलं आहे. नरेंद्र मोदींनी रचलं आणि खान तशी माती या न्यायायाने त्या खाली देवेंद्र फडणवीस हे येतात. काय बदनामी केलीय़ महाराष्ट्र करत होता कोरना काळापासून सर्व विषयांवर ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकले आणि विकत घेतले. तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही .त्याच्या सरकार बनवलं यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही, असा टोला राऊतांनी हाणला.

ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे,  तेव्हा या राज्याची बदनामी होत नाही. तत्कालीन राज्यपालांनी महात्मा फुलेंपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्यांनी जी वक्तव्य केली बदनामीकारक आणि तुम्ही त्याचे समर्थन करत होतात.  महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे भाडेके तट्टू म्हणत आहात. तुमच्या राज्यांमध्ये रोज खून मारामारी हत्या बलात्कार होता है कि राज्याची बदनामी नाही का असा सवाल राऊतांनी विचारला.  तुमच्या विधानसभा अध्यक्षला मराठी येत नाही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात ही राज्याची बदनामी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने तर ती जनता भाडे की तट्टू ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी असे वक्तव्य करतात, अशी टीका राऊतांनी केली.  आणीबाणी उधळून लावली जाईल नेपोलियन अलेक्झांडर आणि सिकंदर सुद्धा आले आणि गेले लक्षात घ्या कोणताही स्वतःला जगत जगता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरएसएसचा इतिहास त्यांनी समजून घ्यावा, मी त्यांना पुस्तक पाठवतो.   महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे हे लक्षात ठेवा असे राऊत म्हणाले.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ