AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: रिक्षावाल्यांना मारतो, तसं नार्वेकरांना मारायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या मराठीवरून संजय राऊतांचा खरमरीत टोला

Sanjay Raut on Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना चुका केल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut: रिक्षावाल्यांना मारतो, तसं नार्वेकरांना मारायचं का? विधानसभा अध्यक्षांच्या मराठीवरून संजय राऊतांचा खरमरीत टोला
संजय राऊत यांचा नार्वेकरांना खरमरीत टोलाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 10:48 AM
Share

Sanjay Raut on Rahul Narvekar: विधानसभेच्या अधिवेशनात आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना अध्यक्ष राहुल नार्वेकर आता वादात सापडले आहे. त्यांच्या मराठीच्या उच्चारावरून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच नार्वेकर यांच्या वाचनाचा समाचार घेतला होता. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय़ राऊत हे चांगलेच संतापले. मराठी भाषक राज्याच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी वाचता येऊ नये हे गंभीर असल्याचा फटका त्यांनी लगावला. त्याचवेळी ते नार्वेकर नसून नॉर्वेकर असल्याचा टोलाही लगावला.

विधानसभा अध्यक्षांवर राऊतांची टीका

हा महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर विषय आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्ष पदावर बसलेली व्यक्तीला मराठी बोलता येत नाही. मराठी बोलता येत नाही. मराठी वाचता येत नाही. मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत, युरोपमध्ये नॉर्वे या नावाचा देश आहे, हे नार्वेकर नाही तर नॉर्वेकर आहेत, असा चिमटा राऊतांनी काढला. नार्वेकर हे परकीय नागरिक तर नाही ना, याचा शोध घ्यावा लागेल. या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी यायला हवे असा आपण आग्रह धरतो, कायदा करतो. राज्यात केवळ मराठीची सक्ती आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात. पण त्यांनी नेमलेल्या विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही. ते मराठीचे धिंडवडे काढतात. पद्मविभूषण, स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना वाचता येत नाही, मांडता येत नाही. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की ते भेळचा कागद वाचत होते का? हे बरोबर आहे.

ज्या विधानसभा अध्यक्षांना मराठी लिहिता, वाचता, बोलता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. त्यांच्या हृदयाची धडकनं मराठी नाहीत, ठोके मराठी नाहीत. असा माणूस तिथं बसवाला गेला. मराठीचा अपमान केला म्हणून ताबडतोब त्यांना या पदावरून दूर केले पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

त्यांना मराठी वाचता येत नसल्याने त्यांनी इंग्रजीत ती लिपी लिहून आणली. अशा प्रकारे लिहून ते तो शोक प्रस्ताव वाचण्याचा प्रयत्न करत होते. कारण त्यांना मराठी वाचता येत नाही असा माझा अनुभव आहे. अशा व्यक्तीला तुम्ही विधानसभेच्या अध्यक्ष पदी बसवता. मुख्यमंत्री छातीठोकपणे सांगतात की राज्यात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, मग नार्वेकरांना मारायचं का? मराठी पाट्या करून म्हणून आपण सक्ती करतो. मग मराठी येत नसताना यांना त्या पदावर बसवले कोणी असा सवाल राऊतांनी केला.

लाज वाटली पाहिजे भाजपला, मराठीचा दहशअवतार त्यांना धिंडवडे काढले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नॉर्वेकरांच्या वतीने माफी मागितली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मुख्यमंत्र्यानी माफी मागायला लावली पाहिजे. नॉर्वेकरांना माफी शब्द लिहून द्यायला पाहिजे. लोढांना अध्यक्ष करा अशी मागणीही राऊतांनी केली.

एका पावसामुळे मुंबई ठप्प

एका पावसामुळे मुंबई ठप्प झाली. ही जबाबदारी भाजपच्या सरकारची आहे. मुंबईतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहे. ह्याची जबादारी कोण घेणार. मुंबईचे पालकमंत्री हे बिल्डर आहे, त्यांच्याच अर्धे काम त्यांची आहे. मेट्रो, ररस्ते ह्यांची कामे अर्धे बाकी आहे. मुंबईकरांनी प्रवास कसा करावा, तुमच्याकडे पोलिस आहेत. त्यांचे ताफे आहेत. सर्वसामान्य लोकांचं काय आहे. उद्धव ठाकरे आधी बैठक घेत होते, आता तसं दिसत नाही. जे खासदार फुटले त्यांच्यासाठी चार्जर फ्लाईटचा पास काढून दिला आहे, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत