लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अमोल कीर्तिकर विजयी होणार…संजय राऊत नेमके काय म्हणाले?
केंद्रातील सरकारही लवकरच बदलणार आहे. मग वंदना सूर्यवंशी कुठे जाणार आहे. या ठिकाणी अमोल कीर्तिकर विजय होणार आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सूर्यवंशी यांनी काम पाहिले. त्या सर्वात भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. त्यांनी मतमोजणी दरम्यान अनेक कारनामे केले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बंद केले. आता ते सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबाबात घेतला आहे. त्या ठिकाणी रवींद्र वायकर यांचे लोक मोबाईल घेऊन फिरत होते. परंतु आता चार महिन्यांत सरकार बदलणार आहे. केंद्रातील सरकारही लवकरच बदलणार आहे. मग वंदना सूर्यवंशी कुठे जाणार आहे. या ठिकाणी अमोल कीर्तिकर विजय होणार आहे. आम्ही न्यायालयात जाणार आहे. त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप संघाला संपवणार
अहंकाराचे सर्व मर्यादा मोदी आणि शहा यांनी सोडली आहे. त्यामुळे आता भाजपामध्ये जे आरएसएसची लोक बसलेली आहेत ते मोदींविरोधात बंड पुकारणार आहे. देशात दोन तानाशहा (नरेंद्र मोदी, अमित शाह) राज्य करत आहेत. आरएसएसने हे देखील सांगितले होते की भाजप आणि शिवसेनेची युती तुटू देऊ नका. परंतु त्यांचे ऐकले गेले नाही. आरएसएसने एक नैतिक ताकद भाजपाला दिली आहे. परंतु भाजपाने आता आरएसएसला संपवण्याचा ठरवलं आहे.
मोहन भागवत कुठे गेले
मोहन भागवत कुठे काश्मीर अन् मणिपूरमध्ये गेले. मोहन भागवत यांनी मणिपूर आणि काश्मीरमध्ये जावे. आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. फक्त बोलून काय होणार? तुम्ही नेतृत्व करा आम्ही येऊ तुमच्या सोबत.