AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : आमदार मनिषा कायंदेंसह तीन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?

ठाकरे गटाला झटक्यावर झटके बसत आहेत. शिशीर शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त ताजं असतानाच आता आमदार मनिषा कायंदे या ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार आहेत. त्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Video : आमदार मनिषा कायंदेंसह तीन नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 18, 2023 | 11:24 AM
Share

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे हे लंडनमध्ये असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाच्या एका आमदारासह तीन नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे. हे चारही नेते आज दिवसभरात कधीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटाकडे आमदार आणि नगरसेवकांची आवक सुरू झाल्याने ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमदार आणि नगरसेवकांच्या या बंडावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासून त्यांचा फोन नॉट रिचेबलही झाला आहे. त्यांच्यासोबत मुंबईतील तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्या ऐवजी ठाकरे गटातून नेते आणि पदाधिकारी जात असल्याने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. उद्या पक्षाचा स्थापना दिवस असतानाच आज पक्षाला खिंडार पडलं आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

कचरा इकडचा तिकडे…

संजय राऊत हे आज वरळीत आहेत. वरळीत शिवसेनेचं शिबीर सुरू आहे. या शिबीरात भाग घेण्यासाठी आले असता राऊत यांना मनिषा कायंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली. कोण जाणार त्यांचं नाव माहीत नाही. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका उलटला तर परत आमच्या दारात येतो. ते फार महान लोक नाहीत. सोडून द्या त्यांना, असं संजय राऊत म्हणाले.

पक्ष चिंतन करेल

यावेळी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकारावर पक्ष चिंतन करेल, मनन करेल, त्यावर निर्णय घेईल. जे गेले त्यांचा स्वार्थ काय होता. हेतू काय होता. ते उघड होऊ दे. नंतर त्यावर बोलू, असं सुनील प्रभू म्हणाले.

तसूभरही फरक पडणार नाही

ठाकरे गटाचे आमदार, नेते भास्कर जाधव यांनीही या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचा दिवस चांगला आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. उद्याचा दिवसही चांगला आहे. त्यामुळे चांगलं बोला. जे 40 आमदार, 13 खासदार गेले त्याने शिवसेना तसूभर डगमगली नाही. शिवसेना दिवसागणिक वाढत जात आहे. वाढत जाणार आहे, असा दावा भास्कर जाधव यांनी केला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.