AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवसांची कोठडी स्थगित, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात राऊतांना 15 दिवसांच्या कोठडीची शिक्षा याआधी सुनावण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी माझगांव कोर्टात अपील केलं होतं. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.

15 दिवसांची कोठडी स्थगित, 50 हजारांच्या जातमुचलक्यावर संजय राऊत यांना जामीन मंजूर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 25, 2024 | 4:42 PM
Share

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आज माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे स्वत: आपले भाऊ आमदार सुनील राऊत यांच्यासोबत कोर्टात हजर झाले होते. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील सुनावणीसाठी उपस्थित होते. यावेळी कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. तसेच कोर्टाने याआधी राऊतांना 15 दिवासांची कोठडी सुनावली होती. पण ती शिक्षा देखील आता कोर्टाकडून स्थगित करण्यात आली आहे. खरंतर संबंधित प्रकरणावर कोर्टात काल सुनावणी होणार होती. पण काही कारणास्तव ती आज झाली. संजय राऊत स्वत: या सुनावणीला उपस्थित होते. या प्रकरणात 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दंडाधिकारी कोर्टाने दोषी ठरवत राऊतांना 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांच्या अपील अर्जावर आज माझगांव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. संजय राऊत यांना झालेल्या 15 दिवसांच्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दंडाधिकारी कोर्टाने दिलेली 30 दिवसांची मुद्दत संपणार होती. त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी दाखल केलेल्या अपीलावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.पी. पिंगळे यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली.

संजय राऊत हे काल स्वतः कोर्टात उपस्थित नव्हते. हा मुद्दा उपस्थित करत मेधा सोमेय्या यांच्या वकिलानी अपील याचिकेला विरोध केला होता. विशेष म्हणजे कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असं कोर्टाने संजय राऊतांना काल खडेबोल सुनावले होते. जामीन अर्जच्या सुनावणी वेळी अपीलकर्ता हे स्वतः हजर राहणे गरजेचं, असा युक्तिवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली.

प्रकरण काय आहे ?

  • मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ आणि १६ एप्रिल २०२२ ला‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
  • हे वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे मेधा यांनी तक्रारीत म्हटले होते.
  • राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत.
  • सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता.
  • मेधा यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होत असल्याचा निर्वाळा देऊन दंडाधिकारी न्यायालयाने २६ सप्टेंबरला राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती.
  • मात्र, निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यासाठी न्यायालयाने राऊतांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित करून त्यांना जामीनही मंजूर केला होता
  • मात्र कोर्टाने दिलेली 30 दिवसांची मुद्दत संपत आहे म्हणून संजय राऊत यांना आज या प्रकरणात जामीन घ्यावा लागणार आहे

Follow Us
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण
सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन.....
Trimbakeshwar Kumbh Mela Flag Hoisting : सप्त नद्यांच्या पवित्र जलाने अभिषेक, देवतांचं आवाहन अन् ध्वजपूजन; त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचा विधिवत प्रारंभ
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य ध्वजारोहण सोहळा; कुंभपर्वाला सुरुवात
पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात
Sanjay Raut : पूर्णेकर समर्थकांना मारहाण; ठाणे पोलीस पालकमंत्र्यांची धुणीभांडी करतात का? संजय राऊतांचा थेट सवाल
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...