संजय राऊत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतायत?; वाचा सविस्तर

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज 'सामना'मध्ये लिहिलेलं 'रोखठोक' वाचण्यासारखं आहे. ते फक्त शिवसेनेच्याच नाही तर आघाडी आणि राज्यातल्या भाजप नेत्यांनीही नक्की वाचावं.

संजय राऊत एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न करतायत?; वाचा सविस्तर
political leader

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज ‘सामना’मध्ये लिहिलेलं ‘रोखठोक’ वाचण्यासारखं आहे. ते फक्त शिवसेनेच्याच नाही तर आघाडी आणि राज्यातल्या भाजप नेत्यांनीही नक्की वाचावं. कारण आजच्या ‘रोखठोक’मध्ये संजय राऊत हे भूतकाळात काय घडलं, वर्तमानात काय घडतं आहे आणि विशेष म्हणजे भविष्यात शिवसेनेचा गोतावळा काय असू शकतो याचं चित्रं रंगवताना दिसत आहेत. (sanjay raut hits two birds with one stone, read what he said?)

मोदींशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न?

आजच्या रोखठोकमध्ये प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे मोदींशी जवळीक दाखवण्याचा प्रयत्न. काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनीच मोदींच्या नेतृत्वाची तोंडभरून स्तुती केली होती. तेव्हापासूनच आघाडीच्या नेत्यांमध्येही चलबिचल झाली आहे. आजच्या रोखठोकमध्येही त्याचा पुढचा अंक दाखवण्याचा राऊत प्रयत्न करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीतून दोन संदेश निघतात त्यातला दुसरा संदेश सांगताना राऊत लिहितात- ‘दुसरा एक राजकीय संदेश राज्यातील तीन प्रमुख राजकीय पक्षांसाठी आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी आपला उत्तम संवाद आहे, चिंता नसावी’. राऊतांच्या ह्या ओळीतही दोन अर्थ आहेत. एक उघड उघड दिसतो आहे तर दुसरा मोदींशी उद्धव ठाकरेंची कशी जवळीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. यानंतर मोदी-ठाकरे भेट कशी ठरली आणि मोदींनी कसं लगेचच भेटीसाठी वेळ दिली हे सांगण्याचा राऊतांनी खटाटोपही केला आहे.

आघाडीच्या नेत्यांना वास्तव दाखवण्याचा प्रयत्न?

राऊतांनी आजच्या रोखठोकमध्ये एकीकडे मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे कसे उत्तम संबंध आहेत हे सांगतानाच आघाडीच्या नेत्यांनाही वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या काही काळात ‘पदोन्नतीतील आरक्षणा’च्या मुद्यावर काँग्रेसच सरकारमधून बाहेर पडेल अशी चर्चा रंगली होती. आता राष्ट्रवादी अडीच वर्षानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा करेल आणि हे सरकार पडेल अशी चर्चा रंगली आहे. ती कशी व्यवहार्य नाही हे सांगण्याचा प्रयत्न राऊतांनी आजच्या रोखठोकमध्ये केला आहे. राऊत लिहितात- ‘महाराष्ट्रातील सरकार चालविणे व टिकवणे ही आघाडीतील तिन्ही पक्षांची गरज आहे. मजबुरी हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. केंद्रासह अनेक राज्यात भाजपचे शासन आहे पण महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसेल तर इतर मोठी राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद दुसरे राज्य आहे पण महाराष्ट्राच्या सत्तेतील सहभाग सगळ्यात महत्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही व हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा ब्रँड ठरुनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. अशा वेळी महाराष्ट्राची सत्ता टिकवणे हे तीनही पक्षांना आवश्यक आहे. (sanjay raut hits two birds with one stone, read what he said?)

 

संबंधित बातम्या:

शिवसेना-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय? संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सांगितलं!

उद्धव ठाकरेंचा फोन, ‘मिलना हैं, अब मेरे साथ दो साथी है’, मोदींचा लगोलग रिप्लाय; राऊतांच्या ‘रोखठोक’मधून इनसाईड स्टोरी

मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?

(sanjay raut hits two birds with one stone, read what he said?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI