AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे दिलं तरी, आदित्य ठाकरे यांचा… संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात महत्त्वाचा विषय ठरत नसेल तर तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देता? तुम्ही एसआयटी स्थापन करता.

दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे दिलं तरी, आदित्य ठाकरे यांचा... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे दिलं तरी, आदित्य ठाकरे यांचा... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 25, 2022 | 10:54 AM
Share

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, काखासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे दिलं तरी आम्हाला काहीच हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?, असा सवाल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

दिशा सालियन यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही दडपशाही आहे. दडपशाही, दहशत आहे. सुपारीबाज लोकं सत्तेवर आल्यावर काय होतं तेच दिसतील.

सालियन कुटुंबीयांच्यामागे उद्या हे ईडी लावतील, सीबीआय लावतील. बिच्चारे साधे लोकं आहेत. तरीही सालियन कुटुंबीयांनी काही भूमिका स्पष्ट केली आहे. अजूनही करतील, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यातील सरकारने त्यांच्या गैरव्यवहारांवर चर्चा होऊ नये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि शिवाजी महाराजांच्या अपमानावरून दुसरीकडे लक्ष विचलीत व्हावं. विरोधकांना विधासभा आणि विधान परिषदेत बोलता येऊ नये म्हणून आपल्या शाऊटिंग ब्रिगेडला हाताशी धरून त्यांनी अनावश्यक विषय काढले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात महत्त्वाचा विषय ठरत नसेल तर तुम्ही कोणत्या विषयांना प्राधान्य देता? तुम्ही एसआयटी स्थापन करता. करा एसआयटी स्थापन राज्यपालांविरुद्ध.

करा एसआयटी स्थापन तुमच्या मंत्र्यांविरोधात. ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याविरोधात एसआयटी स्थापन करताय का? राज्यपालांना पाठिशा घालता, लावा एसआयटी, करा चौकशी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यपालांनी केलेल्या अपमानावर बोलता येऊ नये म्हणून हे विषय काढले जात आहेत. राज्यपालांविरोधात करा ना एसआयटी. या माणसाने इथं येऊन आमच्या महापुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केली आहे. तुम्ही त्यांचं भजन गाताय? काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

सर्वसामान्यांचे मुद्दे मांडण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. हे सरकार आलं आहे ते खोके गोळे करण्यासाठी. जे खोके वाटलेत ते वसूल करण्यासाठी आले आहे. जनतेच्या प्रश्नावर किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेवर सरकार स्थापन झालेलं नाहीये.

फक्त शिवसेना फोडायची, शिवसेना खतम करायची, महाराष्ट्राचा स्वाभिमान नष्ट करायचा. याच अजेंड्यावर सरकार आलंय. जनतेच्या प्रश्नावर सरकार आलं असतं तर उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलंच नसतं. जनतेच्या प्रश्नावर काम करणारं सरकार होतं ते, असा दावा त्यांनी केला.

भ्रष्टाचार दडप करायचा एसआयटी स्थापन करण्याची धमकी दिली जाते. महाराष्ट्रात जे घडतंय ते महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं आहे. भाजपला जे हवं तेच घडलं. महाराजांच्या अपमानाचा मुद्दा मागे पडला. त्यांनी चिखलफेक आणि इतर विषय काढले, असं ते म्हणाले.

शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटून निघाला होता. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने बाकीचे विषय काढले. भाजपला महाराजांवर कधी प्रेम नव्हतं. बाबासाहेबांवर आस्था नव्हती.

फुले कधीच आपले वाटले नाही. सीमा प्रश्न कधीच आपला वाटला नाही. त्यामुळे हे विषय कधीच लोकांसमोर येऊ नये म्हणून दिशा सालियन आणि इतर विषय काढले. त्यामुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झालं आहे, असं त्यांनी सांगितलं.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.