जसा समीर, पंकज तसाच सुहास, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे; भुजबळ-कांदे वादावर राऊतांचा सल्ला

| Updated on: Sep 24, 2021 | 11:23 AM

भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासाठी जसा समीर, पकंज आहे. तसाच सुहास आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut reaction on Suhas Kande files Petition against chhagan bhujbal)

जसा समीर, पंकज तसाच सुहास, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे; भुजबळ-कांदे वादावर राऊतांचा सल्ला
संजय राऊत
Follow us on

मुंबई: अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्या वादावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासाठी जसा समीर, पकंज आहे. तसाच सुहास आहे. त्यामुळे सर्व नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. (sanjay raut reaction on Suhas Kande files Petition against chhagan bhujbal)

संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा सल्ला दिला. या दोन्ही नेत्याली वाद विकोपाला जाणार नाही. दोन्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत. एकमेकांचा सन्मान राखणं गरजेचं आहे. सुहास कांदे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. भुजबळ ज्येष्ठ आहेत. त्यांनी या सर्व आमदारांना मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. जसा पंकज, जसा समीर तसा सुहास कांदे. तरुण मुलं आहेत. सांभाळून घेतलं पाहिजे. यात कुठे चढाओढ अहंकार असता कामा नये. तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील, असं राऊत म्हणाले.

मुनगंटीवारांना सवाल

महिला अत्याचारांवरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर टीका केली होती. त्यावरही राऊत बोलले. सुधीर भाऊ खूप संवेदनशील आहेत. मला माहीत आहे. त्यांच्या भावनांचा नक्की विचार केला जाईल. आपल्या राज्यात महिलांवर अत्याचार व्हावेत असं कोणत्या सरकारला वाटतं? रावणालाही वाटत नसेल. रावणानेही सीतेवर अत्याचार केला नव्हता. सीतेला पळून नेलं. पण सन्मानाने सीतेला अशोक वनात ठेवलं. ही या भूमीची परंपरा आहे. इथे आपण स्त्रियांचा सन्मान राखतो. वाईट प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करतो. महाराष्ट्रात महिलांचा नेहमीच सन्मान राखला गेला आहे. स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण सर्वांनी कठोर पावलं टाकली आहेत. हे सर्वांना माहीत आहे. सुधीर भाऊंनाही माहीत आहे. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार संवेदनशील आहे, असं ते म्हणाले.

कांदेंचे आरोप काय?

शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. कांदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी थेट न्यायालयातच धाव घेतली. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर छगन भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. (sanjay raut reaction on Suhas Kande files Petition against chhagan bhujbal)

 

संबंधित बातम्या:

छगन भुजबळांनी निधी विकला, माझ्याकडे 500 पुरावे, शिवसेना आमदाराची थेट हायकोर्टात धाव

मेहबूब शेख प्रकरणावर अडचणी वाढण्याआधी राजेश टोपेंकडून राष्ट्रवादीची सरळ आणि थेट भूमिका स्पष्ट

सकाळी जळजळीत अग्रलेख, दुपारी OBC अध्यादेशावर सही, 12 तासांत दुसऱ्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांचे आभार!

(sanjay raut reaction on Suhas Kande files Petition against chhagan bhujbal)