मोदी आणि शहांनी अघोरी जादू केली; संजय राऊत यांचा दावा तरी काय

Sanjay Raut on Modi-Shah : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर मोठा गंभीर आरोप केला. मोदी आणि शहा यांनी अघोरी जादू केल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

मोदी आणि शहांनी अघोरी जादू केली; संजय राऊत यांचा दावा तरी काय
मोदी-अमित शहांनी अघोरी जादू केली, संजय राऊतांचा दावा
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 9:55 AM

सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय प्रचाराला खुमारी चढली आहे. वाढत्या उन्हासोबतच आरोप प्रत्यारोपाला पण धार चढली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सध्या सांगलीतील प्रचारासह इतर ठिकाणच्या प्रचारावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या मोदी आणि शहांनी अघोरी जादू केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर नव्या वादला तोंड फुटले आहे. त्यावर आता सत्ताधारी गोटातून काय प्रतिक्रिया येते हे लवकरच समजेल.

चोरीचा माल भाजपने चोरला

  • दोघांनी अघोरी जादू केली ; ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचे आघोरी कृत्य मोदी आणि शहा यांनी केल्याचे विधान त्यांनी केले. ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला त्यांना हा धनुष्यबाण वाचविता आला नाही. त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपने चोरला, असा टोला त्यांनी सताधाऱ्यांना लगावला.
  • शिवसेना आणि धनुष्य बाण महाराष्ट्रातून नष्ट करायचा हे त्यांचा स्वप्न होतं आणि त्याला हे 40 खोके वाले बळी पडले. कामाख्या देवीच्या पायापाशीचे रेडे कापले तिथे हीच प्रार्थना केली का की आमचा धनुष्यबाण जाऊ द्या ? तुम्हाला इतिहास माफ करणार नाही, असे त्यांनी ठणकावले.

महाविकास आघाडीचा झंझावात

हे सुद्धा वाचा

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीचे प्रचाराला लागलेलो आहे. आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार शिवसेनेचा आहे वेळ न दवडता आपण मतदारांमध्ये जायला हवं महाविकास आघाडीचे वातावरण हे झंझावात असावा त्या पद्धतीचा दिसत आहे कुणी कितीही डरकाळी फोडल्या तरी महाविकास आघाडीला कोणी रोखू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसने कार्यकर्त्यांची समजूत काढावी

  1. सांगलीमध्ये आमचे उमेदवार चंद्रहार पाटील हे फार आधीच प्रचाराला लागलेले आहेत. मिरजेमध्ये शिवसेनाप्रमुखांची प्रचंड सभा झाली. आदित्य ठाकरे देखील जाणार आहेत आज उद्या परवा मी देखील त्या भागात जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात आघाडी असते, तो मतदारसंघ आपल्यासाठी सुटावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा मनोमन असते.
  2. रामटेक हा आमचा परंपरागत मतदार संघ आहे .आमच्या शिवसैनिकांना वाटत होतं की तो मतदारसंघ आमच्याकडे असावा पण आम्ही त्यांची समजूत काढली आणि तो मतदार संघ काँग्रेसला दिला. छत्रपती शाहू महाराजांचा मतदारसंघ आम्ही काँग्रेसला दिला आमच्याही कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी हट्ट होता पण आम्ही त्याची समजूत काढली. आघाडी मध्ये काम करत असताना दुखावलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढावी लागते. सांगलीमध्ये आणि राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व हे त्या भागातील कार्यकर्त्यांची समजूत काढतील
  3. सांगलीच्या बाबतीत आम्ही काँग्रेसची अनेक पर्यायांची चर्चा केलेली आहे पण लोकसभा निवडणूक हे सांगलीत शिवसेनाच लढणार महाराष्ट्रात किमान 35 प्लस जागा निवडून आणण्याचा मिशन आहे त्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना हातभार लावला पाहिजे.
Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.