AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचे निधन, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट

शरद काळे सरांचे निधन हा आम्हा सर्वांची वैयक्तिक हानी आहे,जी कधीही भरुन येणार नाही.त्यांची उणीव आम्हा सर्वांना कायम जाणवत राहिल. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण काळे कुटुंबियांच्या सोबत आहोत.

शरद पवारांच्या जुन्या सहकाऱ्याचे निधन, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
SHARAK KALE AND SUPRIYA SULEImage Credit source: tv9marathi
| Updated on: Apr 01, 2023 | 7:31 AM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि यशवंतराव चव्हाण सेंटरचे ( Yashwantrao Chavan Centre ) विश्वस्त तथा आदरणीय पवार (sharad pawar) साहेबांचे सहकारी, आमचे मार्गदर्शक शरद काळे (Sharad kale) सर यांचे निधन झाले. ही अतिशय दुःखद बातमी आहे. शरद काळे सरांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून अतिशय भरीव असे काम केले. चव्हाण सेंटरच्या जडणघडणीत त्यांचे अतिशय महत्त्वाचे असे योगदान आहे. ते अतिशय कुशल असे प्रशासक होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांनी अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडल्या अशी भावनिक पोस्ट सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडियावर लिहिण्यात आली आहे.

त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण पुणे येथे झाले.त्यांनी १९६२ साली पुणे येथून गणित विषयात सुवर्ण पदक मिळविले होते‌. त्यानंतर ते १९६३ साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले. यानंतर १९७२ साली हवाई विद्यापिठातून त्यांनी एमबीएची पदवी प्राप्त केली. राज्य व भारत सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या समित्यांवरही त्यांनी काम पाहिलेले होते. निवृत्तीनंतर त्यांनी १९९८ पासून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कामकाजाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली चव्हाण सेंटरने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडले.

शरद काळे सरांचे निधन हा आम्हा सर्वांची वैयक्तिक हानी आहे,जी कधीही भरुन येणार नाही.त्यांची उणीव आम्हा सर्वांना कायम जाणवत राहिल. या कठिण प्रसंगी आम्ही सर्वजण काळे कुटुंबियांच्या सोबत आहोत. सरांच्या पार्थिवावर रविवारी अंतीम संस्कार करण्यात येतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट लिहिली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला त्यांनी अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. त्याचा उपक्रमाचा अनेकांना फायदा झाला आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.