शरद पवार आणि अमित शाह यांच्यात अशी डील ज्यामुळे अजितदादा गटाला फुटला घाम, थेट पक्षच… बड्या व्यक्तीचा दावा काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात कथित गुप्त कराराचा दावा केला आहे. डीलिमिटेशन बिलाला पाठिंब्याच्या बदल्यात पवारांना त्यांचा पक्ष परत मिळेल, असे ते म्हणतात. यामुळे अजित पवार गटात चिंतेचे वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन गोष्टींची चर्चा सुरू आहे. त्यापैकी एक म्हणजे शरद पवार एनडीएसोबत जाणार. दुसरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार. पण या दोन्ही चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नसल्याचं स्पष्टच केलं आहे. त्यामुळे दुसरा मुद्दा निकाली निघाला आहे. मात्र, आता नवीन मुद्दासमोर आला आहे. पवारांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत डील झाली आहे. डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देतो. मला माझा पक्ष द्या, अशी डील या दोघांमध्ये झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया या मीडियाशी संवाद साधत होत्या.
शरद पवार यांनी अमित शहांना सांगितलंय की, त्यांचे खासदार डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देतील. पण त्यांचा पक्ष त्यांना परत हवा. त्यामुळेच सुनील तटकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली. सुप्रिया सुळेंनीही भेट घेतली. लवकरच एनसीपी एनडीएत सामिल होईल, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी कितीही सांगो. त्या आता गोल गोल उत्तर देत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
वेळ पडली तर आंदोलन…
यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. तरुणांवरील सगळे गुन्हे मागे घ्यायला हवेत. केंद्र सरकारने लेखी स्वरुपात माहिती दिली तरी असे त्रास सुरू असतील तर वेळ पडली तर आंदोलन करायला हवं, असं अंजली दमानिया म्हणाल्या.
तिच्याकडे न बघितलेलं बरं
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत यांनी सीजेपीच्या आंदोलनावर टीका केली आहे. त्यावरही अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कंगनाकडे न बघितलेलं बरं. फक्त मोदी सरकारच्या पुढे पुढे करणं हेच त्यांचं काम आहे. त्या मुलांची एकवेळची जेवायची सोय नव्हती. त्यांना गटर प्रोस्टेटेड म्हणून त्या हिणवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सरकारला सोडणार नाही
केंद्र सरकारने नीट पेपरफुटीचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगितलं आहे. कोर्टही स्थापन केले आहेत. पण कोर्टात वकीलच पोहोचले नाहीत. त्यावरही अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात यांचे वकील गैरहजर राहतात. जेनजी या सरकारला सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
रोहित पवार लढतील का?
पेपरफुटी झाली. चेकिंगमध्ये घोटाळे झाले. सेंटरवरूनही वाद सुरू आहेत. 11 लाखात अॅडमिशनची खात्री दिली जात आहे. चौकशी गरजेचीच आहे. पण रोहीत पवार पुढे जाऊन लढतील का? कारण केंद्रात वेगळी समीकरणे सुरू आहेत, असं त्या म्हणाल्या.