सर्वात मोठी बातमी ! शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये तीन तास बैठक; आजोबांनी नातवाला काय सांगितलं?
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर तीन तास महत्त्वपूर्ण बैठक झाली. राज्यातील विकासकामे आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. पार्थ पवारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता, तसेच बारामतीतील विकासकामांवरही बोलणे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, बैठकीचा तपशील गुलदस्त्यात असल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात काल रात्री तीन तास बैठक झाली. शरद पवार यांच्या निवासस्थानीच ही बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विविध विषयावर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. राज्यातील विकास कामाच्या अनुषंगाने या बैठकीचा भर होता, असंही सांगितलं जात आहे. मात्र, बैठकीत नेमकं काय घडलं याचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर तीन तास बैठक झाली. काल रात्री 8.15 वाजता पार्थ पवार सिल्व्हर ओकवर आले होते. रात्री 11.15 वाजता ते सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले. तीन तास आजोबा आणि नातावामध्ये चर्चा झाली. या भेटीचं कारण समजलं नाही. मात्र, दोघांमध्ये राज्यातील राजकीय परिस्थिती आणि विकासाच्या प्रकल्पावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीतील तपशील राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला नाही. मात्र, अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
पार्थ केंद्रात जाणार?
दरम्यान, मोदी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. यावेळी अजितदादा गटाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदासाठी पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या बैठकीत त्या अनुषंगानेही चर्चा झाली असावी, असं सांगण्यात येत आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप कुणीही दुजोरा दिलेला नाही.
बारामतीतील विकास कामावर चर्चा?
दरम्यान, या भेटीत बारामतीतील काही विकास कामांवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. बारामतीत अजितदादा पवार यांचं स्मारक उभारण्यात येत आहे. त्यानुषंगानेही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
15 दिवसानंतरची पहिली भेट
दरम्यान, दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनचं 15 दिवसांपूर्वी आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशभरातील बडे राजकारणी उपस्थित होते. संपूर्ण पवार कुटुंबीयांनी या नेत्यांचं स्वागत केलं होतं. त्यानंतर आज पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली.