AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाबद्दल मोठे भाकीत केले आहे. त्यांच्या मते, मोदी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावे लागेल. राऊतांनी 17 सप्टेंबरनंतर मोठा 'उलगडा' होईल असा दावा केला असून, मोदींचा तो शेवटचा वाढदिवस पंतप्रधान म्हणून असेल असे म्हटले आहे. तसेच, अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2026 | 1:00 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. या राहुल गांधी यांच्या मताशी मी सहमत आहे. उलट मी हे आधीपासूनच बोलत आलो आहोत. थोडं थांबा. 17 सप्टेंबर नंतर मोठा उलगडा होणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान म्हणून मोदींचा यंदा शेवटचा वाढदिवस असेल, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच राऊत यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी राहणार नसल्याचं आणि अमित शाह हे पंतप्रधान होणार नसल्याचं भाकीतही केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

येत्या एक वर्षाच्या आत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावं लागेल, असं राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हटल्याचं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. मी गेले काही दिवस काय सांगतो? मी गेले काही महिने हेच सांगत आहे. पंतप्रधान हे त्यांची टर्म पूर्ण करत नाही. त्यांना वाईट परिस्थितीत पद सोडावं लागेल. तुम्हाला 17 सप्टेंबर नंतर उलगडा होईल, असं संजय राऊत म्हणाले.

अंधभक्तांनी उड्या माराव्या, पार्ट्या कराव्या

17 सप्टेंबरला मोदींचा वाढदिवस आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा शेवटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अंधभक्तांनी उड्या माराव्यात, पार्ट्या कराव्यात, असं सांगतानाच अमित शाह कधीच पंतप्रधान होणार नाहीत. मोदी पायउतार झाल्यावर आहे काय? एकावर एक फ्रि आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगतात. आमच्यासमोर जे काही तथ्य येतात, त्यानुसार मी सांगत आहे. लालकिल्ल्यावर मोदींचं शेवटचं भाषण होतं. पंतप्रधान म्हणून त्यांचा वाढदिवसही शेवटचा असेल. हे मी सर्व जागतिक स्तरावर जे चित्र आहे, त्यानुषंगाने बोलत आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

चोरांनी चोराला सोडलं…

अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चोरांनी चोरायला सोडायचं हे चाललं आहे. चंपत राय आणि अनिल मिश्रा सर्वत्रच आहेत. महाराष्ट्रातही आहेत. त्यांना सोडलं असलं तरी आमचं आंदोलन संपणार नाही. मोरगाव येथे आमचं आंदोलन आहे. मी स्वत: आंदोलनात भाग घेण्यासाठी जात आहे, असं ते म्हणाले.

Follow Us
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात