SC on Shiv Sena Party and Symbol Hearing LIVE : सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार, ठाकरेंच्या वकिलांचा युक्तीवाद..
Supreme Court on Shiv Sena Party and Symbol Hearing Case LIVE Updates in Marathi: आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. यादरम्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. आज देवदत्त कामत युक्तीवाद करतील.
LIVE NEWS & UPDATES
-
साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यादा बंद केले
साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यादा बंद केले…. धरणाच्या पायथा वीजगृहातून 1 हजार 50 कयुसेक पाण्याचा विसर्ग… कोयना धरणाचा पाणीसाठा 98.35 टीएमसीवर पोहोचला… धरणात 11 हजार 657 कयुसेक पाण्याची आवक सुरू…
-
उद्योगमंत्र्यांचं भंडारा जिल्ह्याला मोठं गिफ्ट
पवनीत एमआयडीसी भूखंड दर स्वस्त करण्यात येणार तर साकोलीत भेल प्रकल्पात स्टील प्लांटची योजना तर, मकरधोकड्यात सीएनजी प्रोजेक्टची पायाभरणी करणार अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भंडाऱ्यात केली आहे.
-
-
राजेंद्र दाते यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगरात येऊन देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्यासमोर राजेंद्र दाते यांचं गेल्या 12 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज सायंकाळी उपोषण स्थळावर जाऊन आंदोलकांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मराठा समाज बांधव आंदोलन स्थळावर आले होते. मात्र 5 वाजताची वेळ देऊनही विखे पाटील आठ वाजेपर्यंत उपोषण स्थळावर आले नसल्याचा आरोप करत मराठा समाज बांधवांनी राधाकृष्ण विखेंचा तीव्र शब्दात जाहीर निषेध केला आहे.
-
विदर्भात पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमी
विदर्भात पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमी…. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब…. एल निनोमुळे पुढील काही दिवस पाऊस कमी पडणार… पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप पिकांना फटका
-
पुणे रिंग रोडच्या मोजणीला भोरच्या शिवरे गावातील शेतकऱ्यांचा विरोध
पुणे रिंग रोडच्या मोजणीला भोरच्या शिवरे गावातील शेतकऱ्यांचा विरोध…. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शिवरे ग्रामस्थांनी रोखलं… पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणी न करण्याची मागणी..
-
-
‘शाळांची अवस्था पाहता दादा भुसेंनी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे’- दीपके
‘शाळांची अवस्था पाहता दादा भुसेंनी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा दिला पाहिजे’. अभिजीत दीपकेंकडून शालेय शिक्षणमंत्री भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. आमदारांनी स्वत:च्या मुलांना सरकारी शाळेत पाठवावं-दीपके
-
ट्रम्पमुळं अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचं काम रखडलं-सुजय विखे
अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या दुरवस्थेवरुन अहिल्यानगरच्या आजी-माजी खासदारांमध्ये जुंपलीय.. अहिल्यानगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामाला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा अजब दावा सुजय विखे पाटलांनी केला होता.. यावर निलेश लंकेंनी टोला मारलाय.. सुजय विखेंना ट्रम्प यांनी PA म्हणून नेमावं असं लंके म्हणालेत..
-
-
पुढच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा
कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. ठाकरे गटाचा युक्तीवाद संपला आहे.
-
सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार
सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचे मोठे विधान कोर्टात ठाकरेंचे वकील कामत यांनी केले.
-
कामत यांची कोर्टात अत्यंत मोठी मागणी
सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हावर सुनावणी झाली. यादरम्यान कामत यांनी अत्यंत मोठी मागणी केली. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना एकदाचे अपात्र ठरवा, असे त्यांनी कोर्टात म्हटले.
-
कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांची कोर्टात मोठी मागणी
कपिल सिब्बल यांच्यानंतर कामत यांची पक्षाचे चिन्ह गोठवण्याची मोठी मागणी.
-
शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी
कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांनीही मोठी मागणी कोर्टात केली. त्यांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवण्याची मागणी केली.
-
कोर्टातील आजची सुनावणी संपली
शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आजची सुनावणी संपली आहे.
-
शिंदेंचे टेन्शन वाढले..
राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होते, असे मोठे विधान कोर्टात कामत यांनी केले.
-
विधीमंडळात पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही- कामत
विधीमंडळात पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही, असे मोठे विधान कामत यांनी कोर्टात केले.
-
2018 ची घटना असंविधानिक होती, असे शिंदेंनी कोर्टात म्हटले नाही…
2018 ची घटना असंविधानिक होती, असे शिंदेंच्या युक्तीवादात नव्हते, असे कोर्टात कामत यांनी म्हटलेय
-
शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना कोर्ट अपात्र ठरू शकते, कायद्यावर बोट
शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना कोर्ट अपात्र ठरू शकते, कायद्यावर बोट ठेवत ठाकरेंच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद कोर्टात सुरू आहे, ज्यामुळे शिंदेंच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसतंय.
-
विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वत: अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो- कामत
विशेष परिस्थितीमध्ये कोर्ट स्वत: अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो, असे मोठे विधान कोर्टात कामत यांनी केले.
-
कोर्ट निर्णय घेऊ शकते- कामत
पक्षांतर कायद्यात अध्यक्ष अपयशी ठरले तर कोर्ट निर्णय घेऊ शकते, असे कामत यांनी म्हटले.
-
पक्षातून वेगळे व्हायचे असेल तर वेगळा पक्ष काढा- कामत
पक्षातून वेगळे व्हायचे असेल तर वेगळा पक्ष काढा, असे मोठे विधान युक्तीवादादरम्यान कामत यांनी केले.
-
सुप्रीम कोर्टाने केलेल्या विधानाने शिंदे गटाला मोठा धक्का
आमदारांना अपात्र करण्याचा आम्हाला अधिकार आहे, असे मोठे विधान सुप्रीम कोर्टाने केले. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का आहे.
-
फुटीची परवानगी नाही, फुटणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवा- कामत
फुटीची परवानगी नाही, फुटणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवा, असा युक्तीवाद कोर्टात कामत यांनी केला.
-
चिन्ह कोणाला द्यायचे नसेल तर गोठवा- कामत
चिन्ह कोणाला द्यायचे नसेल तर गोठवा, अशी मागणी कोर्टात शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली.
-
10 व्या सूचीत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्याचे कामत यांनी कोर्टात म्हटले…
10 व्या सूचीत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्याचे कामत यांनी कोर्टात म्हटले. कामत यांच्याकडून जोरदार युक्तीवाद सुरू आहे.
-
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांना देऊन टाकणार का?
5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांना देऊन टाकणार का? असा सवाल यावेळी कामत यांनी उपस्थित केला.
-
अपात्रतेच्या निर्णयाआधीच पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिले..
अपात्रतेच्या निर्णयाआधीच पक्ष आणि चिन्ह शिंदेंना दिल्याचे मोठे विधान कोर्टात कामत यांनी केले.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टाचे मोठे विधान
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. यादरम्यान कोर्टाने मोठे विधान केले. आम्हाला अधिकार आहेत, यात काही शंका नसल्याचे त्यांनी म्हटले.
-
आज युक्तीवाद संपवायचा आहे. मी आता चिन्हाच्या मुद्द्यावर येतो- कामत
आज युक्तीवाद संपवायचा आहे. मी आता चिन्हाच्या मुद्द्यावर येतो, असे मोठे विधान कामत यांनी कोर्टात केले.
-
आमच्याकडे अधिकार आहेत, यात काही शंका नाही- कोर्ट
आमच्याकडे अधिकार आहेत, यात काही शंका नाही, असे मोठे विधान कामत यांच्या युक्तीवादादरम्यान कोर्टाने केले.
-
फूट पडलेली आहे की, नाही याचा सोक्षमोक्ष लावा- कामत
फूट पडलेली आहे की, नाही याचा सोक्षमोक्ष लावा, असे कोर्टात कामत यांनी म्हटले.
-
अध्यक्षानी योग्य रित्या प्रकरण हाताळले नाही- कामत
अध्यक्षानी योग्य रित्या प्रकरण हाताळले नाही, विश्वास गमावलाय. विधानसभा अध्यक्षांविरोधात कामत यांचा जोरदार युक्तिवाद
-
आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला आहे- कामत
कोर्टातील सुनावणीदरम्यान ठाकरेंचे वकील कामत यांनी म्हटले की, आम्ही सुप्रीम कोर्टावरील विश्वास गमावला आहे.
-
सुप्रीम कोर्टात आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार- देवदत्त कामत
सुप्रीम कोर्टात आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार असल्याचे देवदत्त कामत यांनी म्हटले.
-
देवदत्ता कामत यांच्या युक्तीवादाला सुरूवात
विधीमंडळातील निर्णय फक्त संख्याबळ बघून असल्याचे मोठे विधान कामत यांनी केले.
-
आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला- कामत
आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला असल्याचे मोठे विधान देवदत्त कामत यांनी केला.
-
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात
सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरूवात झाली आहे. देवदत्त कामत यांच्याकडून सुनावणीला सुरूवात करण्यात आली.
-
देवदत्त कामत करणार आज युक्तीवाद
शिवसेना ठाकरे गटाकडून कोर्टात आज अर्धातास देवदत्ता कामत युक्तीवाद करणार आहेत.
-
ठाकरे यांच्याकडून जयदत्त कामत कोर्टात बाजू मांडणार
ठाकरे यांच्याकडून जयदत्त कामत कोर्टात बाजू मांडणार आहेत. काही वेळातच सुनावणीला सुरूवात होईल
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हा सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर थोड्याच वेळात सुनावणी होईल. ठाकरेंचे वकील अर्धा तास युक्तीवाद करतील.
-
हॉटेलमध्ये ग्राहक-कामगारांचा तुफान राडा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
शिक्रापूर इथल्या एका हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेलमधील कामगारांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-
भूखंडाचा घोटाळा थांबाव, आदित्य ठाकरेंची मागणी
“मुंबईसाठी पुन्हा सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा. रविवारी संध्याकाळी 5 वाजता तिरंगा हाती घेऊन आंदोलन करणार आहोत. मोकळ्या जागा भाजपच्या आमदारांना दिल्या जात आहेत,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
-
परिवहन विभागाची मुंबईत कारवाई सुरू
परिवहन विभागाची मुंबईत कारवाई सुरू आहे. दादार इथल्या स्वामीनारायण मंदिराजवळ कारवाईला सुरुवात झाली आहे. टॅक्सी चालकांना मराठी येत आहे का? प्रमाणपत्र आहे का याची तपासणी सुरू आहे. काही टॅक्सीचालक परिक्षेत पास तर काही नापास झाले आहेत. काहींना नोटीस देण्यात आल्या आहेत.
-
भाजपच्या मल्हार पाटलांनी नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकरांना लगावला टोला
भाजपच्या मल्हार पाटलांनी नाव न घेता खासदार ओमराजे निंबाळकरांना टोला लगावला आहे. जे नगरसेवक आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून होते, ते दुसऱ्या पक्षात गेल्याने नगरसेवक आमच्यासोबत आले. कदाचित या नगरसेवकांचा ‘त्या’ नेत्यावर विश्वास नसेल म्हणून ते भाजपसोबत येतील, असं ते म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपालिकेतील शिवसेना उबाठाचे 10 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
-
धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे 9, काँग्रेसचा 1 नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश
धाराशिव जिल्ह्यातील कळम नगर परिषदेचे ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे. ठाकरे गटाचे सर्व नगरसेवक हे विकासासाठी भाजपमध्ये आले आहेत, असं ते म्हणाले. धाराशिवचा विकास भाजपच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो म्हणून त्यांनी भाजप प्रवेश केला आहे, असं त्यांनी सांगितलं. एकूण 10 नगरसेवक भाजपात प्रवेश करणार आहेत.
-
डोंबिवलीत 90 फूट रस्त्यावर मध्यभागी भगदाड! VIDEO VIRAL; मोठ्या दुर्घटनेची भीती
डोंबिवलीतील 90 फूट रोड टर्निंगजवळ, बंदिश पॅलेस परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कल्याण-डोंबिवलीला जोडणारा मोठ्या प्रमाणात वर्दळ असणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. भगदाडामुळे एखादे दुचाकी किंवा चारचाकी वाहन थेट खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांनी उसाच्या काठ्या आणि इशाऱ्याचे चिन्ह लावून वाहनचालकांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे कार्यालय काही अंतरावरच असतानाही अद्याप दुरुस्ती न झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
-
लासलगाव- साखरेच्या दरात तब्बल ५० टक्क्यांची वाढ
लासलगाव- साखरेच्या दरात तब्बल ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. लासलगावमध्ये साखर ४२ रुपयांवरून ६४ रुपये किलोवर पोहोचलं आहे. इथेनॉल निर्मिती वाढल्याने साखरेचा पुरवठा घटल्याचा दावा केला जात आहे. मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा कमी झाल्याने दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. ऐन सणासुदीत साखरेच्या दरवाढीने ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.
-
अखेर जळगावातील राष्ट्रीय महामार्गावरील भलामोठा जीवघेणा खड्डा रातोरात बुजवला
‘टीव्ही 9 मराठी’च्या बातमीची दखल घेत अखेर जळगावातील राष्ट्रीय महामार्गावरील भलामोठा जीवघेणा खड्डा महापालिकेच्या नगरसेवकांनी एका रात्रीत बुजवला आहे. राष्ट्रीय महामार्गावर तब्बल साडेनऊ फूट लांब आणि अर्धफूट खोल या खड्ड्यासंदर्भात बातमी दाखवून समस्या मांडली होती. बातमीची दखल घेत नगरसेविका वैशाली पाटील आणि नगरसेवक नितीन सपके यांनी स्वतः भलामोठा खड्डा सिमेंटने बुजवला आहे.
-
विलास घुले खुन प्रकरणात खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करून अटक करा; लाखो लोक होणार सहभागी
बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील तरुण विलास घुले खून प्रकरणात भाऊ रमेश घुले यांनी आपल्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचे नाव दिलेले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच इतर मागण्यांसाठी छत्रपती क्रीडा संकुलापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये लाखो लोक सहभागी होणार असून बीड जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना सहभागी व्हावे यासाठी निरोप दिला आहे अशी माहिती घुलेंचे नातेवाईक आणि जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
-
डोंबिवलीत अमित ठाकरेंची एंट्री, माजी आमदार राजू पाटील स्वागताला
डोंबिवलीत अमित ठाकरेंची एंट्री झाली आहे. प्रगती कॉलेज परिसरात कॉलेज युनिट सेलचे उद्घाटन होणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे डोंबिवलीच्या प्रगती कॉलेजमध्ये दाखल झाले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत झाले. अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि मनसेचे प्रमुख पदाधिकारीही प्रगती कॉलेजमध्ये उपस्थित होते. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीने प्रगती कॉलेज परिसरात मनसे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं
-
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाला गंडा, एकावर गुन्हा दाखल
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास गंडा घालण्यात आला आहे. मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
-
मराठी चाचणी कारवाईवरून आरटीओमध्ये संभ्रम
मराठी चाचणी कारवाईवरून आरटीओमध्ये संभ्रम झाला आहे. फ्लाईंग स्कॉडच्या अधिकाऱ्यांना अद्याप आरटीओ कार्यालयाकडून सूचनाच मिळाल्या नाहीक. रात्री जनसंपर्क अधिकारी भोसले यांनी १० आरटीओ अधिकाऱ्यांची यादी पाठवली. मात्र यातील बहुतांश अधिकारी फोनच उचलत नसल्याची माहिती हाती आली आहे. कारवाईपूर्वी आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र सकाळपासून अद्याप कोणत्याही ठिकाणी भरारी पथकाकडून कारवाई केलेली नही.
-
नागपूरच्या अंबाझरी तलावाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
नागपूरमधील अंबाझरी तलाव महापालिकेने जलपर्णी मुक्त करून त्याला स्वच्छ केलं. तर यानंतर या तलावाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहे. तलाव हा जलपर्णीमुळे दूषित झाला होता. त्यानंतर बोटीने मुख्यमंत्री आणि इतर कर्मचाऱ्यांनी तलावाची पाहणी केली.
-
धनुष्यबाण चिन्हावर निकाल आमच्याच बाजूने लागेल; शिंदे गटाच्या आमदाराचा दावा
मंत्री उदय सामंत हे भंडारा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याने भंडारा जिल्ह्या उद्योगांना गती मिळेल, असा दावा शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भांडेकर यांनी केला आहे. तसेच त्यांनी शिवसेना पक्ष सुनावणीवरही भाष्य केलं आहे. धनुष्यबाण चिन्हावर निकाल आमच्याच बाजूने लागेल, असं विधान आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलं आहे.
-
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची पुन्हा एक मोठी कारवाई
नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाची पुन्हा एक मोठी कारवाई
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका हॉटेलचा अन्न परवाना निलंबित
अवंती स्नॅक्स आस्थापनेचा अन्नपरवाना निलंबित
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने कारवाई
-
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच धावणार इलेक्ट्रिक बसे
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच इलेक्ट्रिक बससेवा होणार सुरू
पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा निर्णय
शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
गेल्या २५ ते ३० वर्षांपासून राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कान्हेरी गुंफांपर्यंत बेस्ट बससेवा होती सुरू
डिझेल, पेट्रोल आणि सीएनजीवर धावणाऱ्या बसेसमुळे प्रदूषण वाढत असल्याने बससेवा बंद करण्यात आली
बससेवा बंद झाल्याने नागरिक आणि पर्यटकांची मोठी गैरसोय
पण आता धावणार इलेक्ट्रिक बस
-
धीरज परदेशी हत्या प्रकरणावरून हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आक्रमक
धीरज परदेशी हत्या प्रकरणावरून हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे आक्रमक
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची घेतली भेट
‘हल्लेखोर एका कुटुंबाचे नव्हे, तर देशाचे गुन्हेगार ते अतिरेकीच’ एकबोटेंचा संताप
“आरोपींचा एन्काऊंटर केला तरी पोलिसांच्या पाठीशी उभे राहू,” एकबोटेंचं विधान
-
उजनी गावच्या जिल्हा परिषद शाळेला अभिजीत दिपके यांची भेट
लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी गावच्या जिल्हा परिषद शाळेत CJP चे अभिजीत दिपके हे पोहचले असून, शाळेच्या सेवा, सुविधांची माहिती घेत आहेत. आपण जिल्ह्यातल्या अनेक शाळेत जाऊन शैक्षणिक व्यवस्थेची माहिती घेणार आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
-
हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद
हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय. दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक. गुरुवारपासून पूर्णवेळ प्रवेशबंद.
-
एखाद-दोन दिवस चॅनलवर दिसलं पाहिजे म्हणून हे चाललं आहे
त्यांची किंमत संपली आहे. एखाद-दोन दिवस चॅनलवर दिसलं पाहिजे म्हणून हे चाललं आहे. जी भाजपं सत्तेत आहे, त्या संघटनेला काम करायचं असतं तर किती केलं असतं. इतकीवर्ष का नाही केलं?. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवा. सत्ता आहे तुमच्याकडे. बाथरुमचा विषय आहे, फि चा प्रश्न आहे. आम्हाला जिथे-जिथे प्रश्न दिसतात ते आम्ही सोडवतो असं अमित ठाकरे यांनी सांगितलं.
-
जिथे नादाला लागणार तिथे मार खाणार – अमित ठाकरे
जिथे नादाला लागणार तिथे मार खाणार. तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करायचय नीट करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा. तुम्ही जर जबरदस्ती करत असाल आमचे सदस्य व्हा. विद्यार्थ्यांना वाटतं मनविसेचा स्टॉल आहे. लोकांना जबरदस्ती खेचून घेऊन जाऊ नका असं अमित ठाकरे म्हणाले.
-
मुलींचा हात धरल्यावर मारणारच – अमित ठाकरे
एबीवीपीचं हे पहिल्यांदा नाहीय. मी विद्यार्थीसेनेचा अध्यक्ष झाल्यापासून ते करतायत. विद्यार्थी त्यांना विचारत नाहीत. कॉलेजच्या आत किंवा गेटवर स्टॉल लावू नका, असं त्यांना साठ्ये कॉलेजने सांगितलेलं. ते मुलींना हात धरुन कुठेतरी घेऊन चाललेले. मुलींना हात धरल्यावर तुम्हाला मारणारचं. त्यांनी आमच्या नादाला लागू नये. तुमची भाजपची संघटना आहे. भाजपं सत्तेत आहे. उत्तम काम तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करु शकता. ते तुम्ही करत नाही. मुलींचा हात धरल्यावर मारणारच असं अमित ठाकरे म्हणाले.
-
नाशिकमध्ये अन्न औषध विभाग प्रशासनाची कारवाई सुरूच
नाशिकच्या गंगापूर रोडवरील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित. ‘अवंती स्नॅक्स’चा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्याने कारवाई. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली. कच्च्या अन्नपदार्थांच्या स्वीकारापूर्वी गुणवत्ता तपासणी केली जात नसल्याचे समोर
-
पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून मारली दांडी
त्याचा परिणाम आता शेती पिकांवर दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने 31 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा मात्र पावसाने घेतली उसंत. पाऊस आला नाही तर मोठ्या प्रमाणात पिकांना नुकसान होण्याची शक्यता. सोयाबीन , कापूस , तूर , धान पिकांवर होत आहे मोठ्या प्रमाणात परिणाम, पिकांवर किड्यांचा प्रादुर्भाव होत असून पाने खाल्ली जात आहे.
-
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील 152 गावांना अद्याप स्मशानभूमी नाही
मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांना 3 ते 10 किमी पायी करावा लागतो प्रवास. जंगल, नदी नाले पार करत मृतदेह नेण्याची ग्रामस्थांवर वेळ. पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अंत्यसंस्कार करणे अत्यंत होते कठीण . पावसामुळे चिता पेटत नसल्याने काही ठिकाणी मृतदेह अर्धवट जळण्याची येते वेळ.
-
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात आज सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर कोर्टात आज सुनावणी आहे. मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. देवदत्ता कामत आज कोर्टात युक्तीवाद करतील.
शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. काल कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज देवदत्त कामत यांचा युक्तीवाद होईल. काल त्यांनी कपिल सिब्बल यांच्या युक्तीवादानंतर आपला युक्तीवाद केला. अपात्रतेवर त्यांनी युक्तीवाद केला. शिवसेना पक्षाचा वापर शिंदेनी केल्याचेही त्यांनी म्हटले. यासोबतच भाजपाची सत्ता ज्या राज्यात आहे, तेथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदार थांबल्याचेही त्यांनी नमूद केले. यादरम्यान त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले. आज देवदत्त कामत आपल्या युक्तीवादात अनेक विषयांवर बोलतील. या सुनावणीमध्ये अनेक मोठे आरोप निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांवर करण्यात आली. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज दुपारी 2 वाजात सुनावणीला सुरूवात होईल. यासह देश- विदेशातील, राज्यातील, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इतर अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॅाग फॅालो करा.
Published On - Aug 20,2026 8:22 AM
