“अकलीचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही”, शिंदे शिवसेना आमदाराचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

शिंदेच्या शिवसेनेतील आमदाराने उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची अक्कल काढली आहे. त्यांचा आणि अक्कलेचा काही एक संबंध नसल्याचा घणाघात या आमदाराने केला आहे. नक्की काय म्हणाले, जाणून घ्या...

अकलीचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही, शिंदे शिवसेना आमदाराचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 4:19 PM

मुंबई | गुढीपाडवा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यातील शिधाधारकांना 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र अवघ्या काही तांसावर गुढीपाडवा आला आहे. मात्र त्यानंतरही शिधाधारकांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठीच्या आंदोलनामुळे आनंदाचा शिधा पोहचू शकला नाही. हा शिधा तालुक्यातील शासकीय गोदामांमध्येच पडून आहे. यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलीय. तसेच या आणि इतर मुद्द्यांवरुन करण्यात येणाऱ्या टीकेवरुन  शिवसेनेतील आमदार चांगलेच संतापलेत. उबाठा गटातील राज्यसभा खासदार संजय राऊत यांचं थोबाड सुजवण्याची भाषा ही या आमदाराकडून करण्यात आली आहे.

“टीका करणं हाच त्याला उद्योग”

“संजय राऊत हा टिकास्त्र सोडत नाही उलट तो नाचा आहे. इतरांच्या तालावर तो नाचतोय. अकलीचा आणि त्याचा कुठलाही संबंध नाही. प्रत्येकावर टीका करणं हाच त्याला उद्योग आहे. माझ्याशी चांगलं बोलाल तर मी नीट बोलेल. तुम्ही मला शिव्या द्याल तर मी काय महात्मा गांधी नाही दुसरा गाल पुढे करायला”, अशी जशास तशी प्रतिक्रिया संजय शिरसाठ यांनी दिली. शिरसाठ यांनी टीव्ही 9 सोबत महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संवाद साधला. यावेळेस त्यांनी ही आक्रमक प्रतिक्रिया दिली.

आनंदाचा शिधा सर्वसामांन्यांना मिळण्यास उशिरा मिळणार आहे. यावरुन राऊतांनी हल्लाबोल केला. आनंदाचा शिधा हा शिंदे गटातील आमदारांना खोक्याच्या स्वरुपात मिळतोय, असा आरोप राऊतांनी केला. या आरोपाला शिरसाठ यांनी सडेतोड उत्तर दिलं.

हे सुद्धा वाचा

“जो शिधा आलाय तो आम्ही सर्व आमदार घरी बनवून खातोय. जोपर्यंत आमचं पोट भरत नाही, तो पर्यंत शिधा लोकांपर्यंत कसा पोहोचणार. अकलीचा आणि यांचा काही संबंध आहे का. कर्मचारी संपावर गेले. आमदार निवासात झाडू मारायला सुद्धा माणूस नव्हता. कोणत्या गोष्टी कुठे जोडायला पाहिजे, याचा थोडाफार तरी सेंस ठेवा”, अशा शब्दात शिरसाठ यांनी राऊत यांचा समाचार घेतला.

“जे तुम्हाला जमलं नाही ते आम्ही केलं. गरिबाचा शिधा आम्ही सुरु केला. गरिबाच्या घरात शिधा जाईल. दोन दिवस उशिरा जाईल पण जाईल”, असाही विश्वास यावेळेस शिरसाठ यांनी व्यक्त केला.

दरम्यान आता शिरसाठ यांनी केलेल्या या टीकेला संजय राऊत कशाप्रकारे आणि काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.