AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून संपकऱ्यांची कोंडी, हे तर दहशत, ब्लॅकमेल आणि वैफल्याचे राजकारण; शिवसेनेचा विरोधकांवर जोरदार हल्ला

एसटी कामगारांच्या संपावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे.

भाजपकडून संपकऱ्यांची कोंडी, हे तर दहशत, ब्लॅकमेल आणि वैफल्याचे राजकारण; शिवसेनेचा विरोधकांवर जोरदार हल्ला
एसटी बस
| Edited By: | Updated on: Nov 19, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई: एसटी कामगारांच्या संपावरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणे तूर्तास शक्य नाही हे विरोधी पक्षालाही पक्के माहीत आहे. कामगारांनीही हे सत्य स्वीकारले आहे, पण भाजप नेत्यांमुळे संपकऱ्यांची कोंडी झाली. 12 आमदारांच्या मंजुरीची फाईल ज्या प्रकारे भाजपने तुंबवून ठेवली त्याच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांचा संपही अडकवून ठेवला आहे. दहशत , ब्लॅकमेल व वैफल्याचे हे राजकारण आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेने दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून ही घणाघाती टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर चर्चा वगैरे होऊन इतरही प्रश्न भविष्यात मार्गी लागतील. तरीही भारतीय जनता पक्षातले लोक संपास चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

‘लडने को तुम और भाषण को हम’

साताऱ्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास हिंसक वळण लागले. सातारा आगारातून एस.टी. बस बाहेर काढणाऱ्या चालकांना भाजप समर्थकांनी हाणामारी केली. अशा घटना आता अन्य ठिकाणी घडू लागल्या आहेत. हे भाजपचे वैफल्य म्हणायला हवे. मुंबईतील आझाद मैदानावर एस.टी. कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या ठिय्या आंदोलनात भाजपचे नेते घुसतात व शेवटपर्यंत लढण्याच्या गर्जना करून आपापल्या घरी आरामात झोपतात. कर्मचारी मात्र तेथे मच्छर, दगडधोंड्यांच्या सहवासात बसून आहेत. त्या ठिय्या आंदोलनात भाजपनेही सात-आठ दिवस पथारी पसरलीय असे दिसत नाही. म्हणजे ‘लडने को तुम और भाषण को हम’ असेच त्यांचे चालले आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला आहे.

शिवसेनेचा हल्लाबोल

>> एसटी महामंडळाचे विलीनीकरण शक्य नाही, असे सरकार सांगत आहे तेव्हा त्यास कायदेशीर आधार आहे. भारतीय जनता पक्ष या विषयावर कामगारांची डोकी भडकवून काय साध्य करणार आहे? कामगारांचा संप मोडावा किंवा फुटावा असे सरकारचे धोरण दिसत नाही, पण चर्चेतून मार्ग निघावा हेच सगळ्यांचे म्हणणे आहे. अशा आडमुठ्या धोरणांमुळे मुंबईतील अडीच लाख गिरणी कामगार देशोधडीस लागला हे वास्तव आहे.

>> सध्याच्या कठीण काळात नोकरी टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे. मोदी सरकारच्या आर्थिक अव्यवस्थेमुळे, नोटाबंदीसारख्या कोसळलेल्या प्रयोगामुळे देशात कोटय़वधी लोकांनी रोजगार गमावला आहे. लॉक डाऊनमुळेही व्यापार-उद्योगाचे बारा वाजले आहेत. मोदी सरकारने अनेक सार्वजनिक उपक्रम कवडीमोल भावात विकायला काढले आहेत. हे चित्र काय सांगते? मोदी सरकारही सार्वजनिक उपक्रम धड चालवू शकत नाही हे सिद्ध झाल्यावरही महाराष्ट्रातील भाजप पुढारी एस.टी. कामगारांची डोकी भडकवीत आहेत. हे माणुसकीला धरून नाही.

>> कामगार उद्ध्वस्त झाला तरी चालेल, त्यांच्या चुली कायमच्या विझल्या तरी चालतील, पण आमचे पुढारीपण टिकले पाहिजे. एसटीतील संपकरी कामगारांच्या खांद्यावर बंदुका ठेवून सरकारवर गोळीबार करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भाजपला त्याचा लाभ मिळणार नाही. एसटीतील रोजंदारीवरील 2,296 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटिसा पाठवल्या आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तर भाजप ‘पीएम केअर फंडा’तून त्यांना आजन्म पगार देणार आहे काय? एसटीत 93 हजार कर्मचारी आहेत. 15 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. ही संख्या हळूहळू वाढत जाईल.

>> काही कामगारांनी यादरम्यान मरणास कवटाळले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कामगार मृत्यूप्रकरणी राज्याच्या परिवहन मंत्र्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ”सरकार किती निष्पाप एस.टी. कर्मचाऱ्यांचे बळी घेणार?” असा प्रश्न विरोधी पक्षनेत्यांनी विचारला आहे. हाच ‘समान नियम किंवा कायदा’ मानायचे ठरवले तर दिल्लीत जे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यात वर्षभरात पाचशेहून जास्त शेतकऱ्यांनी बलिदान केले. त्याबद्दल नक्की कोणाच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, हेसुद्धा आता जनतेला कळू द्या.

संबंधित बातम्या:

राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाचा विचार?

SIDBI आणि Google चा सामंजस्य करार, लघू उद्योगांना 25 लाख ते 1 कोटींपर्यंत कर्ज मिळणार

छगन भुजबळ यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!