VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्या भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. उद्या शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल.

VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी
हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बादही हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:05 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी उद्या भाजप विरोधात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. उद्या शिवसेनेची  (shivsena) पत्रकार परिषद होईल. मीही असेल. शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी असतील. ही शिवसेनेची पत्रकार परिषद असेल. उद्या आम्ही बोलणार तेव्हा संपूर्ण देश ऐकेल. उद्या काय होतं ते बघाच. आता मी काहीच सांगणार नाही. उद्याच काय ते सांगू, असं सांगतानाच हमने बहोत बर्दाश्त किया है, अब बर्बादही हम करेंगे, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांच्या या इशाऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्यातच त्यांनी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील असा बॉम्बगोळा टाकल्याने भाजपचे (bjp) ते तीन नेते कोण? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधतानाच काही इशारेही दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. आय रिपीट, भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असा दावा राऊत यांनी केला आहे.

महाराष्ट्रातही सरकार आहे, याद राखा

यावेळी राऊत यांनी भाजपला सज्जड दम दिला. महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्या. ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

राजकारणाची मर्यादा ओलांडली

हमाम में सब नंगे होते है. एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं.

संबंधित बातम्या:

जगप्रसिद्ध वेरूळ लेणींजवळील जैन कीर्तिस्तंभ हटवणार नाहीत, केंद्रीय मंत्र्यांची ग्वाही, काय आहे वाद?

Maharashtra News Live Update : आशिष शेलार आणि प्रसाद लाड एकाच गाडीतून देवेंद्र फडणवीसांच्या घराकडे रवाना

31 वर्षीय विवाहित तरुणाची आत्महत्या, गुरांच्या गोठ्यातच आयु्ष्याची अखेर, पत्नी-चिमुरडीचे छत्र हरपले

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.