AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोथळा काढणं म्हणजे नक्की काय?, चंद्रकांतदादांना पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू, त्यांनी वाचावं; राऊतांचा खोचक टोला

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना खोचक टीका केली. कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. (shiv sena leader sanjay raut slams again chandrakant patil)

कोथळा काढणं म्हणजे नक्की काय?, चंद्रकांतदादांना पुरेंदरेंचं शिवचरित्रं पाठवू, त्यांनी वाचावं; राऊतांचा खोचक टोला
sanjay raut
| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई: ते माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. (shiv sena leader sanjay raut slams again chandrakant patil)

संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही खोचक टीका केली. कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. त्यावर आपली परंपरा करा काय आहे हे मी त्यांना समजावत होतो. ती आपली परंपरा नाही, आपण समोरून वार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरून वार केला हे मी सांगत होतो. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

आम्ही इतिहास चिवडत बसत नाही

चंद्रकांतदादांना आम्ही शिवचरित्रं पाठवू. शिवचरित्रं त्यांनी वाचलं पाहिजे. सेतू माधवराव पगडींचं शिवचरित्रं पाठवू. बाबासाहेब पुरंदेरंचं पाठवू. रियासतकारांचं पाठवू. अनेक शिवचरित्रांचे खंडं आले आहेत. यातील एखादं पाठवू. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे नक्की काय? त्याचा त्यांनी अभ्यास केला तर आम्ही चर्चा करू. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. आम्ही नुसतं राजकारण करत नाही. आम्ही इतिहास समजून घेतो. इतिहास घडवतो. आम्ही इतिहास चिवडत बसत नाही, अशी टीका त्यांनी केली.

खंजीर खुपसणे हा शब्द वापरू नये

राजकारणात कोणी साधूसंत असतं का? तुमचं आज राज्यात सरकार नसेल. पण आमचं तीन पक्षाचं सरकार आहे ना, तरीही तुम्हाला तुमचं सरकार यावसं वाटतं. याला काय म्हणतात? हे राजकारण आहे, असं सांगतानाच दुसऱ्याने केलं तर पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही भल्या पहाटे अजित पवारांना घेऊन सरकार बनवलं ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर पाठीत खंजीर खुपसला. राजकारणात देशभरात अशा गोष्टी सुरू असतात. मध्यप्रदेशात माधवरावांच्या सुपुत्रांना काँग्रेसपासून फोडलं. ते राजकारण. दुसरं कोणी केलं असतं तर खंजीर खुपसला. हे शब्द आता राजकारणात कोणी वापरू नयेत. वापरले जाऊ नयेत. राजकारण गेल्या काही वर्षापासून याच पद्धतीने सुरू आहे. याला पारदर्शक राजकारण म्हणत नाही, असं ते म्हणाले.

मी राजकारण सोडेन म्हणालो होतो

संजय राऊत यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये. जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं होतं. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी संन्यास घेईल असं म्हटलं नाही. राजकारण सोडेल असं म्हटलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

जनतेने तुम्हाला घरी बसवलं, आम्हाला नाही

सध्या तरी जनतेने आम्हाला घरी बसवलं नाही. तुम्हाला बसवलं आहे. आम्ही तीन वर्षे सत्तेत राहणार आहोत. आमची महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे. पुढच्या निवडणुकीत जनता तुम्हालाच पुन्हा घरी बसवेल. आम्ही सत्तेत येऊ. पाच वर्षे सत्तेत राहू, असा चिमटाही त्यांनी काढला.

तुलना योग्य नाही

यावेळी त्यांनी जावेद अख्तर यांच्या विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या देशात कोणत्याही संस्थेची तालिबानशी तुलना करणं योग्य नाही. हा लोकशाही मानणारा देश आहे. काही लोकांचं बोलणं आम्हाला आवडत नाही. तरीही या देशात तालिबानी प्रवृत्ती वाढणार नाही. इथली जनता लढणारी नाही. संघर्ष करणारी आहे, असं ते म्हणाले. (shiv sena leader sanjay raut slams again chandrakant patil)

संबंधित बातम्या:

संघाची तालिबानशी तुलना, जाहीर चर्चा करा नाही तर माफी मागा; नितेश राणेंचं जावेद अख्तरांना पत्रं

VIDEO | आपलं सरकार असलं तरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करा, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही, शरद पवारांना तात्काळ अटक करा, गुणरत्न सदावर्दे यांची आक्रमक मागणी

(shiv sena leader sanjay raut slams again chandrakant patil)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.