AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिरसाट यांचा जयंत पाटील यांना छातीवर हात ठेवून खरं सांगण्याचं चॅलेंज

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जयंत पाटील हे शरीराने महाविकास आघाडीत असले तरी ते मनाने महायुतीत आहेत. तसेच त्यांच्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, असा दावा शिरसाटांनी केला. पण त्यांच्या या दाव्यावर जयंत पाटील यांनी टोला लगावला. त्यानंतर शिरसाट यांनी जयंत पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिरसाट यांचा जयंत पाटील यांना छातीवर हात ठेवून खरं सांगण्याचं चॅलेंज
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 01, 2024 | 7:23 PM
Share

मुंबई | 1 जानेवारी 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. येत्या 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल येणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणवार निकाल येणार आहे. याशिवाय राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची चिन्हं आहेत. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. जयंत पाटील लवकरच महायुतीत येतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिरसाटांना टोला लगावला. त्यामुळे संतापलेल्या संजय शिरसाट यांनी जयंत पाटील यांना थेट छातीवर हात ठेवून खरं सांगण्याचं चॅलेंज दिलं आहे.

“जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत, पण मनाने इकडे आहेत. त्यांना महायुतीत यायला जास्त वेळ लागणार नाही. जयंत पाटील येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता”, असा दावा संजय शिरसाट यांनी काल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “माझा आणि त्यांचा काही संबंध नाही. मनाने इकडे आणि शरिराने तिकडे असं भासवणारे लोकं इकडेही आहेत. असं चालतच असतं. माणसाने कुणीही विधानं केली तरी त्यांची ही विधानं आहे. उलट तुम्ही त्यांनाच अधिक खोलात विचारा. मला जी माहिती नाही ही त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होईल”, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

‘त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की हे खरं की खोटं’

जयंत पाटील यांच्या टीकेला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं. “जयंत पाटील यांना चांगलं माहिती आहे की, संजय शिरसाट खोटं बोलत नाही. मी काही ठाकरे गटाचा खासदार संजय राऊत नाही. मी जे बोलतो ते अधिकृतपणे आणि माहिती असेल तेवढंच बोलतो. म्हणून जयंत पाटील यांनी किती खोटं रेटून बोलल असलं तरी त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की हे खरं की खोटं. याशिवाय वृत्तवाहिन्यांनीदेखील दाखवलं आहे, यामध्ये जयंत पाटील यांनी ते स्वत: कितीदा भेटले, याबाबत खुलासा केला आहे. त्यांना आवश्यकता वाटत असेल तर मी अनेक पुरावे द्यायला तयार आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

‘अफवा बातम्या पसरवून काही उपयोग नाही’, राऊतांची शिरसाटांवर टीका

दरम्यान, संजय शिरसाट यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. “जयंत पाटील नुकतंच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आले होते. अशाप्रकारे अफवा बातम्या पसरवून काही उपयोग नाही. ज्याला जायतं होतं ते डरपोक, बेईमान लोक होते. जे आता थांबले आहेत ते निष्ठेने थांबले आहेत. मग ते शिवसेनेत असतील किंवा शरद पवार यांच्यासोबत असतील. त्यांना विविध आमिष दाखवली जात आहे. त्यांच्यावर दबाव आणले जात आहे”, असा दावा संजय राऊतांनी केलाय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?