AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमित शाह यांच्यासोबतची ‘ती’ चर्चा… संजय राऊत शिवसेनेशी सहमत नव्हते!! म्हणाले, ‘भविष्य स्पष्ट दिसत होतं, मी तडक निघालो!!’

देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी एक घटनाक्रम सांगत आपल्या पक्षाचा कोणता निर्णय आपल्याला मान्य नव्हता ते सांगितलं.

अमित शाह यांच्यासोबतची 'ती' चर्चा... संजय राऊत शिवसेनेशी सहमत नव्हते!! म्हणाले, 'भविष्य स्पष्ट दिसत होतं, मी तडक निघालो!!'
| Edited By: | Updated on: Feb 14, 2023 | 7:20 PM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीवर मोठे गौप्यस्फोट केले. पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सहमती होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेविषयी सर्व चर्चा आपली शरद पवार यांच्यासोबतच झाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घटनाक्रमावार पुन्हा चर्चा होऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे फडणवीसांच्या या गौप्यस्फोटावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडलीय. यावेळी त्यांनी एक घटनाक्रम सांगत आपल्या पक्षाचा कोणता निर्णय आपल्याला मान्य नव्हता ते सांगितलं.

“फडणवीसांनी पतंग उडवला. आम्ही एकत्र मतं मागितली. २०१४ साली भाजपने युती तोडली होती. त्यांना अहंकार झाला होता. तेव्हाच त्यांनी विश्वासघात केला होता”, असं संजय राऊत म्हणाले.

“ज्या भाजपला महाराष्ट्रात काळं कुत्र विचारत नव्हतं. त्या पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा जुन्या भरोशाच्या मित्राचा घात भाजपने केला. नंतर 2019 मध्ये भाजपला कळलं, शिवसेनेशिवाय आपण जिंकू शकणार नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः ‘मातोश्री’ला आले. हॉटेल ब्लू सी येथे गेलो. मी तिथून निघालो”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

‘मी पक्षाशी तेव्हा सहमत नव्हतो’

संजय राऊत पुढे म्हणाले, “मला तेव्हाच भविष्य दिसत हो.ते मला व्यक्तीशः तो प्रकार आवडला नव्हता. हा मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला जाणार नाही, हे माझ्या मनात पक्कं होतं. व्यासपीठावर देवेंद्रजी बोलत होते. सत्तेचं वाटप समान होईल. याचा अर्थ अडीच-अडीच वर्ष असा आम्ही काढला. प्रचारातही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस होईल, असं म्हटलं. तेव्हा आम्ही काही म्हटलो नाही. शिवसैनिक मुख्यमंत्री होणार, असं आम्ही फार सांगत सुटलो नाहीत.”

त्यावेळी उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते?

संजय राऊत- त्यानंतर झालेल्या पेचात उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते, असा आरोप केला गेला. हे खोटं आहे. संजय राऊत त्या चर्चेत नको होते, असा निरोप आला. मी खरं बोलतो. मी नाणं वाजवून घेतो.

‘बाळासाहेबांचे तसेच मोदींचेही फोटो वापरले’

राऊत– आम्ही युतीत लढलो. मोदी, अटलजी, बाळासाहेबांचे फोटो सगळ्यांनीच वापरले. आताही तेच फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा फोटो त्यांना हवाच आहे.

‘2019 मध्ये भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न होता’

युतीत भाजपच्या जागांवर शिवसेनेने बंडखोर उभे केले, असा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न केल्याचंही वक्तव्य केलंय. यावर संजय राऊत म्हणाले, आमचे 33 लोकं या लोकांनी पाडले. ती लीस्ट आमच्याकडेही आहे. काही ठिकाणी नक्कीच फडणवीस प्रयत्न करत होते. बंडखोरी माघारी घ्यायला त्यांनी मदत केली. पण दुसरेही लोक होते. त्यांचे गौप्यस्फोट करायची ही वेळ नाही.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.