शपथविधीचं रहस्य फडणवीस कधीच सांगणार नाहीत… संजय राऊत यांची ठोक-ठोक उत्तरं. वाचा प्रत्येक मुद्दा सविस्तर!

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक आरोपांना संजय राऊत यांनी या मुलाखतीत रोखठोक उत्तरं दिली.

शपथविधीचं रहस्य फडणवीस कधीच सांगणार नाहीत... संजय राऊत यांची ठोक-ठोक उत्तरं. वाचा प्रत्येक मुद्दा सविस्तर!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 4:49 PM

दिनेश दुखंडे, मुंबईः पहाटेचा शपथविधी, त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकाकडून फडणवीस यांना अटक होण्याची भीती अशा एकानंतर एक वक्तव्यांनी रविवारचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात गाजला. टीव्ही 9 च्या महाराष्ट्राचा महासंकल्प या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतरावरील केलेली वक्तव्ये राजकीय वर्तुळात नव्याने चर्चिली जात आहेत. फडणवीस यांच्या आरोपांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही रोखठोक उत्तरं दिली आहे.

शपथविधीचं सत्य आणि रहस्य देवेंद्र फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, त्यांना यातलं काहीही माहिती नाही. मी त्या वेळी शरद पवार यांच्या संपर्कात होतो, मला सगळं माहिती आहे.. पण हे सत्य कदाचित जनतेसमोर येणारच नाही, अशीही प्रतिक्रया संजय राऊत यांनी दिली आहे. जी वक्तव्य आणि चर्चा नव्यानं चाचपडून पाहिली जात आहेत, त्यावर संजय राऊतांनी दिलेली स्पष्ट उत्तरं पुढील प्रमाणे-

पहाटेचा शपथविधी, शरद पवार यांची खेळी?

संजय राऊत- ही फेकाफेक आहे. अचानक फेकाफेकीला महाराष्ट्रात का ऊत आलाय हे कळत नाही. चांगलं सरकार आलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. सुप्रीम कोर्टाकडे लक्ष आहे. निराशा असल्याने एक प्रकारचं वैफल्य दिसतंय.. अशा प्रकारे अडीच वर्षांपूर्वी ज्या घटनेविषयी माहिती नाही, त्याविषयी येऊन अशा प्रकारे फेकाफेक करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही.

टीव्ही 9 च्या कार्यक्रमात त्यांना असे प्रश्न विचारले ते बरं झालं. लोकांना फडणवीसांचा खरा चेहरा कळला. सत्तेसाठी भाजप किती आसुसलेला आहे.. पहाटे शपथविधी करण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत राहिला. अजूनही आमच्या संपर्कात काँग्रेसचे लोक आहेत, असं म्हणतात. माणसाला सत्तेचा किती अहंकार असावा, हे पाहतोय. फडणवीस यांना स्वतः सभ्य, सुसंस्कृत, काळाचं भान असलेले नेते असं समजत होते.

‘फडणवीसांची लय बिघडली…’

राऊत म्हणाले- पाच-सहा महिन्यांपासून त्यांची लय बिघडत चालली आहे. मंगेशकरांचं गाणं ऐकायला जावं अन् वेगळाच सूर ऐकायला याला. कंप पावणारा थरथरणारा. असं काहीतरी फडणवीस यांच्या बाबतीत जाणवतंय. ते स्वतःचं अवमूल्यन करून घेत आहेत.

त्या (शपथविधीच्या) काळात शरद पवार यांच्या संपर्कात मी होतो. मी शरद पवार यांना चांगलंच ओळखतो. त्यांनी ठरवलं असतं तर ते सरकार चालवलं असतं. ते सरकार पाडण्यासाठी स्थापन करत नाहीत. लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे. राज्याचं स्थैर्य हा त्यांच्या चिंतनाचा विषय असतो.

शपथविधीचं सत्य नेमकं काय आहे?

संजय राऊत- सगळ्यांना जाणून घ्यायची उत्सुकता असली तरी ते सहजपणे उलगडता आलेलं नाही. त्याला वेळ आहे. या शपथविधीचं रहस्य आणि सत्य फडणवीस सांगू शकणार नाहीत. त्यांना काहीच माहिती नाही.

तो शपथविधी राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठीची खेळी?

संजय राऊत- हे एक कारण नक्कीच आहे. राष्ट्रपती राजवट उठणं तितकं सोपं नव्हतं. केंद्रातून भाजपचे प्रमुख लोकं पवार साहेबांच्या सतत संपर्कात होते. शिवसेनेला सोडून सरकार बनवू म्हणत होते. त्याबाबत पवार साहेब माहिती देत होते.

‘दोनदा विश्वासघात झाले-फडणवीसांचा दावा’

संजय राऊत-फडणवीसांनी पतंग उडवला. आम्ही एकत्र मतं मागितली. २०१४ साली भाजपने युती तोडली होती. त्यांना अहंकार झाला होता. तेव्हाच त्यांनी विश्वासघात केला होता. ज्या भाजपला महाराष्ट्रात काळं कुत्र विचारत नव्हतं. त्या पक्षाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. अशा जुन्या भरोशाच्या मित्राचा घात भाजपने केला. नंतर 2019 मध्ये भाजपला कळलं, शिवसेनेशिवाय आपण जिंकू शकणार नाहीत. अमित शहा स्वतः मातोश्रीला आले. हॉटेल ब्लू सी येथे गेलो. मी तिथून निघालो..

‘मी पक्षाशी तेव्हा सहमत नव्हतो’

संजय राऊत पुढे म्हणाले,’ मला तेव्हाच भविष्य दिसत होते. मला व्यक्तीशः तो प्रकार आवडला नव्हता. हा मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला जाणार नाही, हे माझ्या मनात पक्कं होतं. व्यासपीठावर देवेंद्रजी बोलत होते. सत्तेचं वाटप समान होईल. याचा अर्थ अडीच-अडीच वर्ष असा आम्ही काढला. प्रचारातही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस होईल, असं म्हटलं. तेव्हा आम्ही काही म्हटलो नाही. शिवसैनिक मुख्यमंत्री होणार, असं आम्ही फार सांगत सुटलो नाहीत.

उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते?

संजय राऊत- त्यानंतर झालेल्या पेचात उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते, असा आरोप केला गेला. हे खोटं आहे. संजय राऊत त्या चर्चेत नको होते, असा निरोप आला. मी खरं बोलतो. मी नाणं वाजवून घेतो.

‘बाळासाहेबांचे तसेच मोदींचेही फोटो वापरले’

राऊत– आम्ही युतीत लढलो. मोदी, अटलजी, बाळासाहेबांचे फोटो सगळ्यांनीच वापरले. आताही तेच फोटो वापरत आहेत. बाळासाहेबांचा फोटो त्यांना हवाच आहे.

‘2019 मध्ये भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न होता’

युतीत भाजपच्या जागांवर शिवसेनेने बंडखोर उभे केले, असा आरोप फडणवीस यांनी केला. भाजपची साइज कट करण्याचा प्रयत्न केल्याचंही वक्तव्य केलंय. यावर संजय राऊत म्हणाले, आमचे ३३ लोकं या लोकांनी पाडले. ती लीस्ट आमच्याकडेही आहे. काही ठिकाणी नक्कीच फडणवीस प्रयत्न करत होते. बंडखोरी माघारी घ्यायला त्यांनी मदत केली. पण दुसरेही लोक होते. त्यांचे गौप्यस्फोट करायची ही वेळ नाही.

फडणवीस यांच्या अटकेची भीती, प्लॅन होता?

संजय राऊत- मी सतत त्या प्रक्रियेत होतो. मला अटक होणार होती, असे ते म्हणतायत. असं कोणतं कृत्य केलं होतं. खाई त्याला खवखवी. फोन टॅपिंगचं प्रकरण होतं, असा अंदाज आहे. एका महिला अधिकाऱ्याने फोन टॅपिंग केले. संजय राऊत, नाना पटोले, दाऊद, छोटा राजनचा माणूस असं लिहून आमचे फोन टॅपिंगची परवानगी मिळवली.

तत्कालिन गृहमंत्र्याचं स्टेटमेंट घेण्यासाठी अधिकारी घरी पोहोचले तर त्यात भीती वाटण्याचं कारण नाही. राजस्थानमध्येही तेच सुरु आहे. अशोक गहलोत यांचीही चौकशी सुरु आहे. इथे आल्यावर तुम्ही यासंबंधी गुन्हे मागे घेतले. अधिकाऱ्यांना बढती दिली.

अशाच एका फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयनं संजय पांडे यांना अटक केली. कायद्यात तरतूद आहे. दुसऱ्यांचे फोन चोरून ऐकणं हा भयंकर गुन्हा आहे. कदाचित फडणवीसांना क्लीन चीट मिळाली असती. उगाच छाती बडवायची. तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणात अटक केली.

उगाच छाती बडवायची. तुमची छाती एवढी मजबूत नाही….

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.