AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठे मोठे गार केले गम्मतमध्ये… उदय सामंत यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्‍सने वाढवला ठाकरे सेनेचा बीपी… थेट मॅसेज काय?

Shiv Sena Operation tiger Uddhav Thackeray-Eknath Shinde: उद्धव सेनेत उभी फुट पडल्याचे चित्र आहे. स्वतंत्र गट स्थापन करून त्यातील काहींनी नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. तर हे बंड पेल्यातील वादळ ठरणार असल्याचा उद्धव सेनेचा दावा आहे. त्याचवेळी मंत्री उदय सामंत यांचे व्हॉट्सॲप स्टेट्‍सने थेट मॅसेज दिला आहे.

मोठे मोठे गार केले गम्मतमध्ये... उदय सामंत यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्‍सने वाढवला ठाकरे सेनेचा बीपी... थेट मॅसेज काय?
उदय सामंत, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे,Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 10:14 AM
Share

Uday Samant WhatsApp Status Viral: उद्धव सेनेतील बंड हे त्याच खासदारांवर बुमरँग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याच्या पत्रावर 6 पैकी केवळ चार खासदारांनी स्वाक्षरी केली. तर उद्धव सेनेच्या 2 खासदारांनी या पत्रावर स्वाक्षरी केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर फत्ते नाही तर फसण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याचवेळी मंत्री उदय सामंत यांचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स चर्चेत आले आहे. त्यांनी या स्टेटसच्या माध्यमातून थेट मोठा मॅसेज दिला आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगरमध्ये पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. तर उद्या 19 जून रोजी शिवसेनेच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा गट विलीन होणार का? याविषयीचे थेट संकेत या एका मॅसेजमधून देण्यात आलाय का? याची चर्चा होत आहे.

काय आहे ते स्टेट्स?

मंत्री उदय सामंत यांचे व्हॉट्सॲप स्टेट्‍स चर्चेत आले आहे. या स्टेटमध्ये त्यांनी मोठे मोठे गार केले गम्मतमध्ये असे म्हटले आहे. या एका स्टेट्समधून मोठा मॅसेज देण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर हे फसलेले नाही असा संदेश देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. आज 11 वाजता उद्धव सेनेने खासदारांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी व्हिपही बजावण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे सेनेसोबत कोण आणि शिंदे सेनेसोबत कोण हे चित्र स्पष्ट होईल. पण त्याचवेळी उदय सामंत यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्‍सने एक मोठा संदेश दिल्याचे मानले जात आहे.

खासदार श्रीकांत शिंदे दिल्लीत तळ ठोकून

तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे दिल्लीत तळ ठोकून आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यात असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सकाळी सहाही खासदारांशी फोनवरून संपर्क साधल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे अजूनही मोठा सस्पेन्स कायम आहे. दुपारनंतर चित्र स्पष्ट होईल.

ठाकरेंना 2029 मध्ये निवडणुकीसाठी नाही मिळणार उमेदवार

उद्धव ठाकरे यांना 2029 मध्ये निवडणुकीसाठी उमेदवार मिळणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. 2024 म्हणजे उद्धव ठाकरे यांची शेवटची निवडणूक होती, भाजप आमदार नारायण कुचे यांचा ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत यांना हमीभाव कसा काय माहित आहे? तेच आत मधून या भावामध्ये सामील असतील असा आरोपही कुचे यांनी केला. संजय राऊत यांनीच मागचं(ठाकरे सरकार)सरकार घातलेला आहे, तेच पैसे घ्या म्हणत आहेत असा आरोप आमदार नारायण कुचे यांनी केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी