AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाई और बहनो… आपको जो मच्छर काटता है…’, उद्धव ठाकरे यांनी केली मोदी यांची मिमिक्री

"धारावी अडानीकडे, गोवंडीही देणार आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते ये सूटबुट की सरकार आहे. सूट त्यांना बूट आम्हाला. आमचं सरकार आलं तर बूट काय असतो हे आम्ही दाखवतो. धारावीत बुट बनतात. पापडं बनतात, लोणची बनतात. जास्त नादी लागला तर पापडासारखं लोळून टाकू", असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

'भाई और बहनो... आपको जो मच्छर काटता है...', उद्धव ठाकरे यांनी केली मोदी यांची मिमिक्री
uddhav thackeray and narendra modi
| Updated on: Dec 16, 2023 | 6:03 PM
Share

मुंबई | 16 डिसेंबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली. धारावी विकास प्रकल्पात अनेक ऋुटी असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. अदानी उद्योग समूहाला या प्रकल्पाचं काम सरकारकडून देण्यात आलं आहे. पण यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंचा आहे. तसेच धारावीकरांना केवळ 350 चौरस फुटाची घरे न देता 500 चौरस फुटाची घरे द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंनी या मागणीसाठी आज धारावी ते अदानी उद्योग समूहाचं कार्यालय असलेल्या बीकेसीपर्यंत भव्य मोर्चा काढला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी उद्योगपती गौतम अदानी, भाजप यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली.

“आम्ही धारावीचा गळा घोटण्याचा जीआर काढला का? २०१८ला तुम्हीच होता. हे पाप देवेंद्रचं आहे. आमचं नाही. शेवटच्या कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेतला होता. मी लहानाचा मोठा झालो, या बाजूला. धरावीकरांना मी म्हटलं, भाई बहनो मेरा और आपका बहोत पुराना रिश्ता है. आपको काटने वाला मच्छर मुझे काटता है”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मोदीची मिमिक्री केली.

‘जास्त नादी लागला तर पापडासारखं लोळून टाकू’

“वास्तव आहे. नातं जोडायला काही जोडता येतं. आम्ही कलानगरला राहतो. 50 ते 60 वर्षे झाली. तेव्हा रस्ता होता का? तेव्हा खाडी होती. पण तेव्हापासून सरकारी कर्मचारी वसाहत होती. मी काल सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालो. आपलं सरकार येणार जुनी पेन्शन योजना लागू करणार”, असा शब्द उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. “धारावी अडानीकडे, गोवंडीही देणार आहे.  काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते ये सूटबुट की सरकार आहे. सूट त्यांना बूट आम्हाला. आमचं सरकार आलं तर बूट काय असतो हे आम्ही दाखवतो. धारावीत बुट बनतात. पापडं बनतात, लोणची बनतात. जास्त नादी लागला तर पापडासारखं लोळून टाकू”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

‘जिथल्या तिथे घर द्या’

“करोनाशी लढणारी धारावी अदानीला शरण जाईल काय? कोरोनाच्या काळात पात्र अपात्र ठरवले नाही. यांचा डाव लक्षात घ्या. अपात्र लोकांना मिठागरात टाकणार. मिठागराचा निर्णय झाला नाही. म्हणजे अदानीलाही ही जागा देणार. इथली उचलणार आणि तिकडे टाकणार. मिठाचा खडा ठिक आहे. अख्खं मिठागर टाकताय. सर्व अदानीला देत आहे. एवढं सर्व करत आहात. काय मिळणार साडे तीनशे फूट घर? 500 फूट घर द्या. जिथल्या तिथे घर द्या. ट्रान्झिस्टचे चोचले जाणार नाही. उद्या शिफ्ट करतील आणि रेल्वे नंतर तुम्हाला घर खाली करायला सांगेल. अदानीने रेल्वेच्या जागेवर घर बांधावं. धारावीकरांचं घर बांधू नये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘आमच्याकडे रस्त्यावरची ताकद आहे’

“धारावीचा विकास सरकारने करावा. सवलती आणि अधिकार वाढवून देण्याची मूभा ठेवली आहे. कोणत्या बिल्डरला तुम्ही सवलती दिल्या का? भीती वाटणार नाही. भाजपचं सरकार दलाल आहे. पालिका निवडणूक घेण्याची हिंमत नाही. महापालिकेची निवडणूक झाली तर आम्ही येऊ मग अदानीचं काय होणार? आज ना उद्या सरकार येईल तेव्हा काय करायचं ते करू. शिवसेना विकासाआड येऊ नये म्हणून खाली केलं. माझा पक्ष चिन्ह चोरलं पण शक्ती कशी चोराल? विश्वास कसा चोराल? तुमच्याकडे कागद आणि पेन असेल. पण रस्त्यावरची ताकद आमच्याकडे आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.